मनोज जरांगे यांचाही दसरा मेळावा!:नारायण गडावर आयोजनासाठी चाचपणी; राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

मनोज जरांगे यांचाही दसरा मेळावा!:नारायण गडावर आयोजनासाठी चाचपणी; राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हेदेखील आता दसरा मेळावा घेणार आहेत. त्यासाठी नारायणगडावर जागेची चाचपणी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका ते या मेळाव्याच्या माध्यमातूनच स्पष्ट करतील, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील राजकारणात दसरा मेळाव्यांना मोठे महत्त्व आहे. शिवसेनेच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याची चर्चा जगभरात होत होती. आता उद्धव ठाकरे देखील तेथे मेळावा घेतात. त्यातच आता एकनाथ शिंदे हे देखील दुसरा मेळावा घेत आहेत. दुसरीकडे पंकजा मुंडे बीडमध्ये तर नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा देखील चर्चेत असतो. त्यातच आता मनोज जरांगे पाटील देखील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाची संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी या आधी केली होती. त्यामुळे या संदर्भातली भूमिका ते या मेळाव्यात स्पष्ट करतील, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातूनच भूमिका स्पष्ट करतील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सहाव्यांदा उपोषण सुरू केले होते. मात्र अचानक त्यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतकेच नाहीतर पाटील यांना भेटायला येणाऱ्या लोकांना देखील न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दवाखान्यात कोणीही येऊ नका, लवकरच आपली भेट होईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आता दसरा मेळाव्याची चाचपणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळाव्याच्या माध्यमातूनच आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण:निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी; पोलिसांच्या निलंबणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल बदलापूरच्या अक्षय शिंदेंच्या एन्काउंटर प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित ठेवण्यात यावे अशी मागणी देखील याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा… धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नका:नरहरी झिरवळ आक्रमक; मंत्रालयालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी सोमवारपासून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराच त्यांनी दिली आहे. इतर आदिवासी आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे. पूर्ण बातमी वाचा… निवडणुकांमध्ये जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल:रोहित पवार यांचा विश्वास; सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीचा सुपडा साफ केला आहे. यातील दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हेदेखील आता दसरा मेळावा घेणार आहेत. त्यासाठी नारायणगडावर जागेची चाचपणी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका ते या मेळाव्याच्या माध्यमातूनच स्पष्ट करतील, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील राजकारणात दसरा मेळाव्यांना मोठे महत्त्व आहे. शिवसेनेच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याची चर्चा जगभरात होत होती. आता उद्धव ठाकरे देखील तेथे मेळावा घेतात. त्यातच आता एकनाथ शिंदे हे देखील दुसरा मेळावा घेत आहेत. दुसरीकडे पंकजा मुंडे बीडमध्ये तर नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा देखील चर्चेत असतो. त्यातच आता मनोज जरांगे पाटील देखील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाची संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी या आधी केली होती. त्यामुळे या संदर्भातली भूमिका ते या मेळाव्यात स्पष्ट करतील, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातूनच भूमिका स्पष्ट करतील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सहाव्यांदा उपोषण सुरू केले होते. मात्र अचानक त्यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतकेच नाहीतर पाटील यांना भेटायला येणाऱ्या लोकांना देखील न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दवाखान्यात कोणीही येऊ नका, लवकरच आपली भेट होईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आता दसरा मेळाव्याची चाचपणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळाव्याच्या माध्यमातूनच आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण:निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी; पोलिसांच्या निलंबणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल बदलापूरच्या अक्षय शिंदेंच्या एन्काउंटर प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित ठेवण्यात यावे अशी मागणी देखील याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा… धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नका:नरहरी झिरवळ आक्रमक; मंत्रालयालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी सोमवारपासून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराच त्यांनी दिली आहे. इतर आदिवासी आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे. पूर्ण बातमी वाचा… निवडणुकांमध्ये जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल:रोहित पवार यांचा विश्वास; सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीचा सुपडा साफ केला आहे. यातील दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment