बागेश्वर धाम महाराज यांच्या कथेत चेंगराचेंगरी:विभूती घेण्यासाठी एकमेकांच्या अंगावर चढले लोक, अनेक महिलांची तब्येत बिघडली
महाराष्ट्रातील भिवंडी येथील बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाली. माणकोली ब्लॉकजवळील इंडियन ऑईल कंपनीच्या सत्संग कार्यक्रमासाठी धीरेंद्र शास्त्री आले होते. आपण स्वत: सर्व लोकांना विभूतीचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जमाव नियंत्रणाबाहेर गेला. चेंगराचेंगरीत अडकलेल्या काही महिलांची प्रकृती खालावली. मात्र, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. चेंगराचेंगरी होताच धीरेंद्र शास्त्री मंचावरून निघून गेले. बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री शनिवारी भिवंडीतील माणकोली ब्लॉकजवळील इंडियन ऑईल कंपनीत एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर आपण विभूती देणार असल्याचे धीरेंद्र शास्त्री यांनी जनतेला सांगितले. आधी महिलांनी यावे, मग पुरुषांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. बाबांकडून विभूती घेण्यासाठी आधी सर्व महिलांनी रांग लावली. महिलांच्या रांगेमागे पुरुष रांगेत उभे होते. विभूतीचे वाटप होत असताना काही वेळातच गर्दी एवढी जमली की, ती नियंत्रणाबाहेर गेली. सर्वजण विभूती घेण्यासाठी पुढे जात होते. मात्र यावेळी स्टेजजवळ मोठी गर्दी झाल्याने लोक एकमेकांवर चढू लागले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. प्रत्येकाला विभूती हवी होती. त्यासाठी प्रत्येक जण पुढे सरकत होता. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली. गर्दी वाढताच धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून निघून गेले
या घटनेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये गर्दी दिसत आहे. या गर्दीत लोकं एकमेकांना ओढत होते. त्यावेळी उपस्थित काही बाऊन्सर्सी लोकांची मदत केली. त्यांनी लोकांना गर्दीतून बाहेर काढले. गर्दीत अडकल्याने अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना स्टेजवर एका बाजूला बसवून ठेवण्यात आले होते. ही गर्दी पाहून धीरेंद्र शास्त्री स्टेजवरुन उठून निघनून गेले. त्यानंतर लोकं मोठ्या प्रमाणावर स्टेजवर जाऊ लागले. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.