परभणी: महाराष्ट्र राज्याचे विधानसभाचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना परभणीत मराठा आंदोलनकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे कार्यक्रमासाठी रविवारी परभणीत आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या ताफ्यासह विरोधी पक्षनेते निघाले असता रेल्वे स्थानकासमोर थांबलेल्या मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर येत विजय वडेट्टीवार यांच्या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखविले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस निरिक्षक चितांबर कामठेवाड, पोना. संतोष सानप, पोलीस शिपाई शोएब पठाण यांच्या पथकाने आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

आठ दिवसानंतरही उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका नाही, नितीन गडकरी दुर्घटनास्थळी
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांकडून नेत्यांना विरोध करण्यात येत आहे. मागील काळातही नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. त्यामुळे नेत्यांची मोठी कोंडी झाली होती. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली असून जरांगेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

ओबीसी आरक्षणासाठीही एल्गार

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मागणीला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. जालन्यातील अंबड येथे ओबीसी समाजातर्फे एल्गार मोर्चा काढत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा सरकारला इशाराही देण्यात आला.

प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, विजय वडेट्टीवार भडकले

Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *