धुळे : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. यानंतर राज्यात आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र झाला आहे. धुळ्यातही मराठा समाजाच्या तरूणांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी आज चाळीसगाव चौफुली येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले.

मराठा आरक्षणासंदर्भात धुळ्यात मराठा आंदोलन आक्रमक झाले असून आंदोलकांमध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील सहभागी झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मराठा आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली येथे केला रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमध्ये अजित पवारांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांनी देखील आंदोलकांसोबत सहभाग नोंदवत रास्ता रोकोत घोषणाबाजी केली आहे.

विखेंच्या अंगावर भंडारा फेकणाऱ्याला भाजप शहराध्यक्षांनी तुडवला पण काही तासांतच माफी मागितली, नेमकं काय घडलं?

एकीकडे मराठा आंदोलकांवर जालन्यात लाठी चार्ज झाल्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आता दुसरीकडे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी रास्ता रोकोत सहभाग घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सुरज चव्हाण हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी धुळे दौरावर आले असता, राज्य सरकारविरोधात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले असता त्यांनीही रास्ता रोकोत सहभागी होत घोषणाबाजी केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *