Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 21, 2022, 4:38 PM

Abhidnya Bhave New Photo अभिनेत्री अभिज्ञा भावे नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तिचा हॉच अंदाज पाहायला मिळतोय.

 

abhidnya bhave
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अभिज्ञा भावे नेहमीच चर्चेत असते. ती सध्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिज्ञा साकारत असलेल्या वल्लीवर लोक कितीही वैतागले, तरीही अभिज्ञाची भूमिका चाहत्यांना खूप आवडते. मालिकांमध्ये अनेकदा लबाड, कपटी अशी व्यक्तिरेखा साकारणारी अभिज्ञा खऱ्या आयुष्यात मात्र फार वेगळी आहे. तिच्या आयुष्यातील आलेले चढ-उतार तिनं नेहमीच चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
दारुच्या नशेत कपिल… जेव्हा राजू श्रीवास्तव यांनी केला होता मोठा खुलासा
अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात. अभिज्ञानं नुकताच शेअर केलेला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिज्ञानं स्विम सूटमधले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षा होतोय. अभिज्ञा काही दिवसांपूर्वी तिच्या काही सेलिब्रिटी मित्र मैत्रिणींसोबत ट्रीपवर गेली होती. तिथलाच हा फोटो आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख हिनं अभिज्ञाचा हा फोटो काढलाय.
कोमात गेल्यावर काय होतं, काहीसे असे होते राजू श्रीवास्तव यांचे शेवटचे ४० दिवस
ते कधीच पुरणार नाही! थोडं थांबा, स्वत:साठी वेळ काढा. स्वत:वर प्रेम करणं गरजेचं आहे. असं अभिज्ञा म्हणतेय.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिज्ञानं शेअर केलेली पोस्ट चर्चेत होती. घराच्या गणपतीला निरोप देताना अभिनेज्ञा भावुक झाली होती. अभिज्ञानं लिहिलं होतं की, ‘हे वर्ष खऱ्या अर्थाने खास होतं, माझा विघ्नहर्ता सगळी विघ्न त्याच्याबरोबर घेऊन गेला. हा कठीण काळ मागे टाकून पुढच्या वर्षी अधिक जोमाने तुझी सेवा करायची वाट बघू! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.’

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.