मराठवाड्यात 10,11 जानेवारी रोजी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता:शेतकऱ्यांनी पिकाची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला
आगामी दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानाचा पारा आणखी दोन ते चार अंशांनी घटणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात त्यानंतर तापमानात वाढ होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, विदर्भातील तापमान हे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेले अंदाजानुसार आगामी 10 आणि 11 जानेवारी रोजी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देखील हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. 12 ते 16 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद या परिसरात घेण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 10 आणि 11 जानेवारी रोजी या भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात किमान तापमान 4.4 अंशावर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाह वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तापमानावर त्याचा परिणाम होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे तापमान दोन ते चार अंशाने घटले असल्याची नोंद घेण्यात येत आहे. आगामी 24 तासात किमान तापमान वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात कमालीची घटना झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. धुळे जिल्ह्यात किमान तापमान 4.4 अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे येथील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… निवडणूक आयोग पारदर्शकतेच्या बाबतीत नाकाने कांदे सोलते:उद्धव ठाकरे गटाची टीका; ‘आप’वरील टीकेमुळे काँग्रेसचेही टोचले कान दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे व नायब राज्यपाल हे अशा प्रदेशांचे सर्वेसर्वा असतात. पण नायब राज्यपाल हे गृहमंत्रालयाचे एजंट म्हणून कर्तव्य बजावताना सध्या दिसतात. आचारसंहिता लागू होताच दिल्लीतील मुख्यमंत्री व मंत्र्यांचे सर्व अधिकार काढून घेतले जातात, पण दिल्लीचे नायब राज्यपाल भाजपसाठी काम करत असतात. हे धोकादायक आहे. निवडणूक आयोग पारदर्शकतेच्या बाबतीत नाकाने कांदे सोलत आहे, पण पडद्यामागे भाजपच्या फायद्याचे बरेच काही सुरू आहे. दिल्लीची विधानसभा निवडणूक हायजॅक करण्यासाठी भाजप कोणतीही पातळी गाठेल. लोकांनी सावध राहावे इतकेच आम्ही सुचवू शकतो. असे म्हणत ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. दैनिक सामनाच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीतील निवडणुकीबाबत भाजपवर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा….