Tina Munim Love Story: बॉलिवूडमधील सुपरस्टार असलेले दिवंगत राजेश खन्ना हे त्यांच्या सिनेमांबरोबर त्यांच्या व्यक्तिगत (Rajesh Khanna) आयुष्यासाठी ही खूप चर्चेत असायचे. राजेश यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये तर त्यांचे व्यक्तिगत आयुष्य खूपच चर्चिले गेले होते. डिंपल कपाडिया (Dimple Kapadia and Rajesh Khanna) यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच १९७२ मध्ये राजेश यांच्याशी लग्न केलेलं. राजेश डिंपल यांच्यापेक्षा १६ वर्षांपेक्षा मोठं होते. परंतु लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी आपण चुकीचा निर्णय घेतल्याची जाणीव दोघांनीही झाली होती. हळूहळू त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि कालांतरानं ते वेगळे राहू लागले होते. हे दोघं वेगळे रहात होते त्याचवेळी राजेश यांच्या आयुष्यात टीना मुनीम आल्या.

जिंकला होता मिस बिकिनी अवॉर्ड

टीना मुनीम यांनी देव आनंद यांच्या देस परदेश (१९७८) सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. लहानपणापासूनच टीना यांना मॉडेलिंगची आवड होती. पहिल्यापासूनच टीना यांचा स्वभाव मोकळाढाकळा होता. असं सांगितलं जातं की टीना यांनी १९७५ मध्ये स्पेन येथील अरुबा मध्ये इंटरनॅशनल टीन प्रिसेंस कॉन्टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या कार्यक्रमात टीना यांना मिस फोटोजेनिक आणि मिस बिकिनी पुरस्कार मिळाला. त्यामुळे देव आनंद यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं त्यामुळेच त्यांना आगामी सिनेमासाठी साईन केलं.

​टीना यांच्या सौंदर्यावर भाळले राजेश

टीना यांनी केवळ सिनेमा विश्वात नाही तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायचं होतं. इतकंच नाही तर त्यांना पॅरिसला जाऊन फॅशन डिझानिंगचा अभ्यासही करायचा होता. परंतु देव आनंद यांनी दिलेल्या ऑफरमुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. सिनेमात पदार्पण केल्यानतंर टीना यांच्या सौंदर्यावर राजेश खन्ना भाळले होते. टीना यांना देखील राजेश आवडायचे. ८० च्या दशकात टीना आणि राजेश यांच्या प्रेमप्रकरणाची (Tina Munim Rajesh Khanna Love Affair) जोरदार चर्चा झालेली.

​टीना यांचा होता लग्नाचा हट्ट

त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार राजेश यांनी आपल्याशी लग्न करावे यासाठी टीना त्यांच्या खूप मागे लागल्या होत्या. राजेश यांनी देखील डिंपल यांच्याशी घटस्फोट घेऊन लग्न करू असंही त्यांना सांगितल्याचं बोललं जातं. पण राजेश यांनी कधीही डिंपल यांच्याकडे घटस्फोटाची वाच्यता केली नव्हती.

​नात्याला भविष्य नसल्याची टीना यांना झाली जाणीव

राजेश यांच्याशी लग्न करण्याचं टीना याचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं. त्यामुळे राजेश डिंपलना घटस्फोट देणार नाही, याची जाणीव टीना यांना झाली. डिंपल यांच्याशी घटस्फोट घेऊ असं राजेश यांनी अनेकदा म्हटल्याचं टीना यांचं म्हणणं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी कधीही डिंपल यांच्याकडे यासंदर्भात बोलणं केलंच नाही. त्यामुळे टीना यांना राजेशबरोबरच्या नात्याचं भवितव्य अंधारात असल्याची जाणीव होऊ लागली. अखेर वैतागून टीना यांनी राजेश यांच्याबरोबरचं नातं संपुष्टात आणलं. टीना राजेशपासून कायमच्या दूर गेल्या. परंतु या दोघाचं जेव्हा ब्रेकअप झालं तो किस्सा देखील खूप रंजक होता.

​ब्रेकअप करताना टीना यांनी राजेशना दिलेलं खास ‘गुडबाय गिफ्ट’

दूर जाण्याचा निर्णय टीना यांनी घेतला तेव्हा राजेश यांनी त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. राजेश अक्षरशः रडले होते. परंतु टीना यांनी हा कठोर निर्णय विचार करून घेतला होता. जेव्हा टीना राजेश यांच्या आयुष्यातून कायमच्या गेल्या तेव्हा त्यांच्यासाठी एक छानसं गुडबाय गिफ्ट देऊन गेल्या. टीनानं राजेश यांना त्यांच्या टॉप २० सिनेमांचे फोटो काढून त्यांना वेलवेटच्या कव्हरमध्ये ठेवून ते त्यांना दिलं. असं सांगितलं जातं की टीनानं या कव्हरवर सिनेमांची नाव सोन्याच्या धाग्यानं लिहून घेतली होती.

सिनेमाचं शूटिंग सुरू असताना झालेलं ब्रेकअप

‘सौतन’ सिनेमाचे दिग्दर्शक सावन कुमार यांनी टीना यांना त्यांच्या आगामी ‘सौतन की बेटी’ सिनेमासाठी साईन केलं होतं. त्यावेळी असे बोलले जाते की, टीना अधिकतर राजेश यांच्याच घरी असायच्या. सावन कुमार टीना यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी तिथेच जेवण केलं आणि सिनेमाचं शेड्यूल्डही तयार केलं. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी १३ लाखांचा खर्च झाले आणि त्या दोघांचा ब्रेकअप झाला. अशी चर्चा झाली की त्यावेळी राजेश खन्ना यांनी सावन यांना सांगितलं की या त्यांच्या दोघांपैकी कुणीतरी एकच असेल. त्यामुळे सावन कुमार यांनी या दोघांनाही न घेता नवीन कलाकारांना घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा सिनेमा जितेंद्र आणि जयाप्रदा यांना घेऊन तयार करण्यात आला.

‘​ते फक्त स्वतःवर प्रेम करतात अन्य कुणावर नाही’

आपल्या आयुष्यामध्ये नातेसंबंध दुरावताना राजेश यांनी पाहिले होते. त्यानंतर ते एकाकी झाले. ना त्यांना पत्नीची साथ मिळाली ना गर्लफ्रेंडची. टीना यांनी स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, राजेश खन्ना कुणावरही प्रेम करूच शकत नाही. कारण ते फक्त स्वतःवरच प्रेम करतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.