मविआचं ‘जोडे मारो’ आंदोलन:उद्धव ठाकरे, शरद पवार हुतात्मा चौकात, मविआचा मोर्चा ‘गेट वे’च्या दिशेने
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली. महाविकास आघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील हुतात्मा चौकाकडून गेटवे ऑफ इंडियाकडे महाविकास आघाडीचा मोर्चा रवाना झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या मोर्चाची सांगता होणार आहे. निदर्शनामुळे गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.या मोर्चात शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे (SP) अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेही सहभागी होणार आहेत. दुसरीकडे भाजपकडूनही दादरसह अनेक भागात विरोधकांचा निषेध करण्यात येत आहे.