मुंबई: विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलियाच्या आठव्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलची बॅट ऑस्ट्रेलियासाठी अफगाणिस्तान विरुद्ध चांगलीच तळपली. मॅक्सवेलने १२८ चेंडूत नाबाद २०१ धावा करून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध कांगारू संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियन संघ ८.२ षटकात ४ बाद ४९ धावांवर झुंजत होता तेव्हा मॅक्सवेल सहाव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून क्रीझवर आला आणि लवकरच १८.३ षटकात ७ बाद ९१ अशी धावसंख्या झाली, परंतु तिथून ३५ वर्षीय क्रिकेटपटूने सूत्रे हाती घेतली.

मॅक्सवेलने कर्णधार कमिन्स (१२*) सोबत ८व्या विकेटसाठी २०२ धावा जोडून ऑस्ट्रेलियाला ४६.५ षटकात २९३ धावांचे लक्ष्य गाठण्यात मदत केली. अफगाणिस्तानवरील विजय हा ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी विजय होता आणि त्यांच्या सलग सहाव्या विजयासह ते आता उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत, जिथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.

ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान मॅक्सवेल अप्रतिम शैलीत फलंदाजी करत होता. त्याने आपल्या डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी दिलेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला. मुजीब उर रहमानने मॅक्सवेलचा सोपा झेल सोडला आणि एकदा डीआरएसनेही त्याच्या बाजूने काम केले. मॅक्सवेल क्रॅम्प्सशी झुंजत होता आणि क्रीजवर असताना त्याला धावता येत नव्हते, पण त्याने हार मानली नाही. तो शेवटपर्यंत तिथेच राहिला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देत नाबाद परतला.

Glenn Maxwell wife Century Inst story.

जेव्हा मॅक्सवेलने षटकारासह २०० धावा पूर्ण केल्या आणि आपल्या संघाला सामना जिंकण्यास मदत केली, तेव्हा वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असलेली त्याची पत्नी विनी रमनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हृदयस्पर्शी तीन शब्दांच्या कॅप्शनसह एक स्टोरी पोस्ट केली. विनी मूळची भारतीय असून तिने गेल्या वर्षी मॅक्सवेलशी लग्न केले होते. तिची पोस्ट व्हायरल होत आहे.

Glenn Maxwell wife Double Century Inst story.

धावांचा पाठलाग करताना वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल हा पहिला फलंदाज आहे. क्रीजवर असताना त्याने २१ चौकार आणि १० षटकार मारले. सध्या सुरू असलेला आयसीसी पुरुषांचा विश्वचषक २०२३ हा मॅक्सवेलसाठी संस्मरणीय ठरत आहे कारण अफगाणिस्तानविरुद्धच्या त्याच्या शानदार कामगिरीपूर्वी त्याने दिल्लीत नेदरलँड्सविरुद्ध वर्चस्व गाजवले होते. २५ ऑक्टोबर रोजी, त्याने केवळ ४० चेंडूत शतक झळकावले, जे एकदिवसीय विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *