पिंपरी, पुणे : ‘तू प्लॉटिंगमध्ये बराच पैसा कमावला आहे. तुला जर व्यवसाय करायचा असेल तर मला महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यायचा आणि तो जर दिला नाहीस, तर तुला खल्लास करेल. मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे’, अशी धमकी देत ७८ हजार रुपये घेऊन फरार झालेल्या सराईताला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

सुनील सोपान जाधव असे पकडण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी खून आणि बलात्कार अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दखल आहेत. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संदीप उर्फ संजय काळोखे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. फिर्यादी संदीप काळोखे यांचा तळवडे येथे प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. यावरून धमकी देऊन खंडणी मागत असल्याची तक्रार त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे केली होती. ‘तू प्लॉटिंगमध्ये भरपूर पैसे कमावले आहेस. माझ्यावर खुनाची केस आहे. मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे. मला १० हजार रुपयांचा हप्ता दे, असे म्हणत गुगल पे आणि रोख रक्कम असे एकूण ७८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसंच याबाबत पोलिसांना सांगितल्यास तुला खल्लास करेल, त्या बदल्यात आणखी दोन लाख रुपये द्यावे लागतील आणि पैसे न दिल्यास तुझ्या मुलाचा खून करेल, अशी धमकी देत आरोपी पैसे घेऊन फरार झाला होता.

पुण्यात खळबळ, ३ लाखाची लाच, आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेस प्रदेश महासचिवाला अटक
या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी कुरुळी – मोई येथून आरोपी सुधीर याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास देहू रोड पोलिस करत आहेत. हा प्रकार जानेवारी २०२२ ते १२/३/ २३ दरम्यान घडला आहे.

Pune : घरची परिस्थिती हलाखीची, नोकरीला रामराम ठोकला अन् शेतकऱ्याचा मुलगा बनला DYSPSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *