नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि त्यांचे चुलत भाऊ भाजप खासदार यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केदारनाथ मंदिरात दर्शनावेळी राहुल गांधी आणि वरुण गांधी यांची भेट झाल्याची माहिती आहे. राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्यात सार्वजनिक भेटी कमी होत असतात. गांधी परिवाराशी संबंधित राजकीय जाणकारांनी वरुण गांधी यांच्या भविष्यातील राजकीय निर्णयांच्या संदर्भात चर्चा सुरु केल्या आहेत. संजय गांधी आणि मेनका गांधी यांचा मुलगा असलेले वरुण गांधी गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या बैठकांमध्ये दिसलेले नाहीत. अनेक मुद्यांवरुन भाजपच्या भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिका वरुण गांधी यांनी घेतल्या होत्या. वरुण गांधी संध्या पीलभीत मतदारसंघातून खासदार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार केदारनाथ मंदिराबाहेर राहुल गांधी आणि वरुण गांधी यांची भेट झाली आहे..

वरुण गांधी यांच्या मुलीला पाहून राहुल गांधी आनंदी

सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी या भेटीवेळी वरुण गांधी यांची मुलगी अनुसूइया हिला भेटून आनंदी झाले. दोन्ही नेत्यांनी या भेटीत राजकीय चर्चा केली नसल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे. राहुल गांधी गेल्या तीन दिवसांपासून उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये आहेत. तर, वरुण गांधी त्यांच्या कुटुंबासह केदारनाथच्या दौऱ्यावर आहेत. बद्रीनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वरुण गांधी त्यांच्या कुटुंबासह केदारनाथला पोहोचले होते. तर, राहुल गांधी गेल्या तीन दिवसांपासून केदारनाथमध्ये आहेत. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी भारत जोडो यात्रा काढली होती. त्या यात्रेत त्यांनी पंजाबमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरुण गांधी यांना भेटू शकतो. त्यांची गळाभेट घेऊ शकतो. मात्र, त्यांच्या विचारधारेचा स्वीकार करु शकत नाही, असं म्हटलं होतं.Read Latest And



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *