मुंबई: आपल्या अष्टपैलू खेळीने भारतीय संघाला गरज असताना अक्षर पटेलने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. सध्या अक्षर पटेलने सुरु असलेल्या मालिकांमधून ब्रेक घेतला आहे. अक्षर पटेलच्या घरी सध्या सनई चौघडे वाट आहे. आज बुधवारी अक्षर पटेल आणि मेहा पटेल हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. बुधवारी झालेल्या संगीत सोहळ्यात ही जोडी अतिशय सुंदर लूकमध्ये दिसली. दोघांच्या भव्य स्वागताचा व्हिडिओ समोर आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी हळदीचा कार्यक्रम होता.

अक्षर पटेलने संगीत सोहळ्यासाठी फिकट क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याची होणारी पत्नी मेहा हिने गुलाबी रंगाची घागरा चोली घातली होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा या जोडप्याने समारंभात प्रवेश केला तेव्हा फटाके आणि रॉकेटसह भव्य स्वागत करण्यात आले. या लूकमध्ये मेहा खूपच सुंदर दिसत होती. या सोहळ्याला त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यांनीही उपस्थिती लावली होती.

वाचा: Republic Day: फक्त मैदानावरच नव्हे, या खेळाडूंनी लष्कराच्या गणवेशातही उंचावली देशाची मान

कोण आहे मेहा पटेल?

अक्षर पटेलच्या पत्नीचे नाव मेहा पटेल आहे. अक्षर आणि मेहा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. या दोघांनी सुरुवातीला आपले नाते मीडियापासून दूर ठेवले. जेव्हा अक्षर पटेलने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याची माहिती दिली तेव्हा मेहाची पहिल्यांदाच ओळख झाली. अक्षर पटेलची पत्नी मेहा पटेल ही न्यूट्रिशिअन आणि डायटेशन आहे. अक्षरने २० जानेवारीला त्याच्या वाढदिवशी मेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. मेहा पटेलचे इंस्टाग्रामवर २१ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे मेहा पटेलच्या हातावर अक्षरच्या नावाचा टॅटूही आहे.

हेही वाचा: ‘शोले 2 लवकरच येत आहे…’, कर्णधार हार्दिक पंड्याची घोषणा, धोनीसोबत शेअर केला फोटो


अक्षर पटेलची क्रिकेट कारकीर्द

भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलनेही नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत, अक्षर पटेलने त्याला मिळालेल्या संधींचा चांगला उपयोग केला आणि आता संघात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. २०१४ मध्ये पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने आतापर्यंत ८ कसोटी, ४९ एकदिवसीय आणि ४० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ४७, ५६ आणि ३७ विकेट घेतल्या आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *