मेळघाट बस अपघातात चौघांचा मृत्यू:अपघातशून्य उपाय शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

मेळघाट बस अपघातात चौघांचा मृत्यू:अपघातशून्य उपाय शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

गेल्या आठवड्यात मेळघाटात झालेल्या खाजगी बसच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. अरुंद रस्ता आणि पुलाला कोणतेही कठडे नसणे, हे या अपघाताचे मूळ कारण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी उद्या, सोमवार, ३० सप्टेंबरला दुपारी ४ वाजता संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीला महसूल, पीडब्ल्यूडी, वनखाते, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पोलिस, आरटीओ आणि इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरील संबंधित यंत्रणेशिवाय अचलपुरचे उपविभागीय महसूल अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) अभियंता यांचा यामध्ये मुख्यत्वेकरुन समावेश करण्यात आला आहे. ज्या रस्त्यावर अपघात झाला, तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. तर ज्या जागेवर अपघात घडला, ती जागा मेळघाट जंगलाचा एक भाग आहे. जंगल संरक्षित करण्यासाठी वनखात्याचे काही नियम आडवे आल्याने हा रस्ता अधिक रुंद करता येत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पुलाला कठडे नसणे किंवा समोरचा पुल अरुंद आणि अतिप्राचीन आहे, असे कोणतेही दिशादर्शक फलक त्याठिकाणी नसणे, हे कशाचे द्योतक आहे, असा काही जणांचा प्रश्न आहे. त्या रस्त्यावर वैद्यकीय पथक किंवा पोलिसही सक्रीय नसतात, ही आणखी एक अडचण आहे. या सर्व प्रश्नांची चर्चा सदर बैठकीत केली जाणार असून त्यातून योग्य तो मार्ग काढला जाणार आहे. अमरावतीहून धारणीकडे जाणारी चावला ट्रॅव्हल्सची खाजगी बस पुलावरुन कोसळल्याने गेल्या आठवड्यात दोन डॉक्टर महिलांसहित चौघांचा बळी गेला आहे. शिवाय बसमधील जवळपास सर्वच प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत. वेळ भरुन काढण्याच्या नादात चालकाने वेग वाढविला आणि आधीच्या रात्री पाऊस पडल्यामुळे त्याठिकाणी घसरगुंडी तयार झाली होती, असे प्राथमिक अहवालातून पुढे आले आहे. यावरही सदर बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या अपघाताच्या अनुषंगाने शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी थेट राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. अपघातासाठी जबाबदार असलेली सर्व कारणे शोधून काढत प्रशासनाने यावर तोडगा शोधावा, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान त्वरेने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

​गेल्या आठवड्यात मेळघाटात झालेल्या खाजगी बसच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. अरुंद रस्ता आणि पुलाला कोणतेही कठडे नसणे, हे या अपघाताचे मूळ कारण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी उद्या, सोमवार, ३० सप्टेंबरला दुपारी ४ वाजता संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीला महसूल, पीडब्ल्यूडी, वनखाते, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पोलिस, आरटीओ आणि इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरील संबंधित यंत्रणेशिवाय अचलपुरचे उपविभागीय महसूल अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) अभियंता यांचा यामध्ये मुख्यत्वेकरुन समावेश करण्यात आला आहे. ज्या रस्त्यावर अपघात झाला, तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. तर ज्या जागेवर अपघात घडला, ती जागा मेळघाट जंगलाचा एक भाग आहे. जंगल संरक्षित करण्यासाठी वनखात्याचे काही नियम आडवे आल्याने हा रस्ता अधिक रुंद करता येत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पुलाला कठडे नसणे किंवा समोरचा पुल अरुंद आणि अतिप्राचीन आहे, असे कोणतेही दिशादर्शक फलक त्याठिकाणी नसणे, हे कशाचे द्योतक आहे, असा काही जणांचा प्रश्न आहे. त्या रस्त्यावर वैद्यकीय पथक किंवा पोलिसही सक्रीय नसतात, ही आणखी एक अडचण आहे. या सर्व प्रश्नांची चर्चा सदर बैठकीत केली जाणार असून त्यातून योग्य तो मार्ग काढला जाणार आहे. अमरावतीहून धारणीकडे जाणारी चावला ट्रॅव्हल्सची खाजगी बस पुलावरुन कोसळल्याने गेल्या आठवड्यात दोन डॉक्टर महिलांसहित चौघांचा बळी गेला आहे. शिवाय बसमधील जवळपास सर्वच प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत. वेळ भरुन काढण्याच्या नादात चालकाने वेग वाढविला आणि आधीच्या रात्री पाऊस पडल्यामुळे त्याठिकाणी घसरगुंडी तयार झाली होती, असे प्राथमिक अहवालातून पुढे आले आहे. यावरही सदर बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या अपघाताच्या अनुषंगाने शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी थेट राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. अपघातासाठी जबाबदार असलेली सर्व कारणे शोधून काढत प्रशासनाने यावर तोडगा शोधावा, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान त्वरेने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment