परभणी: मध्यरात्री महिलेला रेल्वे स्थानकावर घेऊन फिरला, त्यानंतर बाजूच्या मैदानात घेऊन जाऊन महिलेचा खून केल्याचा परभणीत घडला आहे. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा आरोपी दिसून आला आहे. खून प्रकरणातील अज्ञात आरोपीचे छायाचित्र पूर्णा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जारी केले आहे. या आरोपीला कोणी ओळखत असल्यास पूर्णा पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

पूर्णा शहरातील रेल्वेस्थानकाजवळील एका मैदानावर मंगळवारी (दि.२०) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळल्याने पूर्णेकरांत मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला. सकृतदर्शनी त्या महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला असावा, असा अंदाज वर्तवित पोलिसांनी तातडीने त्या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता.

हेही वाचा –दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईतील न्हावा शेवा बंदरावरुन १८०० कोटींचं हेरॉईन जप्त

सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपीचा फोटो पुढे

ही महिला मुस्लिम समाजातील असावी, असे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटविण्यासह हत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी तात्काळ पूर्णा गाठून घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पूर्णा पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले तेव्हा सोमवारी मध्यरात्री पूर्णा रेल्वेस्थानकावरील ओव्हरब्रिज आणि प्लॅटफॉर्मवर त्या महिलेला एक तरुण घेऊन जात असतानाचे फुटेज प्राप्त झाले. पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे आरोपीचा चेहरा निष्पन्न केला असून त्याआधारे आता पूर्णा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा –आयकर आयुक्त बनून उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे गेला, मागणी ऐकून अधिकारीही चक्रावला…

दरम्यान, फोटोसह संबंधित महिलेस कोणी ओळखत असल्यास त्यांनी तात्काळ पूर्णा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मार्कड (९८७५८३२२९८) किंवा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण (९८२३०५३३९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पूर्णा पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केले आहे.

हेही वाचा –बहिणीशी भांडण, भाच्यावर काढला राग, मामाने जे केलं त्यानं अख्खं परळी हादरलं…

अखेर प्रशासनाला जाग, मृत लेकीच्या न्यायासाठी लढणाऱ्या पित्याची भेट घेऊन पोलिसांकडून कारवाईला वेगSource link

Leave a Reply

Your email address will not be published.