वाशिम : वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजली जाणाऱ्या पोहरादेवी गडाचे तीन महंत व पन्नास ते साठ टक्के बंजारा समाज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खळबळजनक माहिती पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी दिली आहे. त्यामुळे हा बंजारा समाजाचे नेते व मंत्री संजय राठोड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (three mahants of banjara community are going to tie shiv bandhan of shiv sena)

एका वृत्त वाहिनीशी बोलताना महंत सुनील महाराज यांनी ही माहिती दिली आहे. पोहरादेवी हे बंजारा समाजाचे सर्वात मोठे शक्तीपीठ आहे. या गडाच्या महंतांचा आदेश बंजारा बांधव शिरसावंद्य मानतात. त्यामुळे मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पूजा चव्हाण प्रकरणात पाय उतार व्हावे लागले. त्यांनंतर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यानंतर राठोडांनी याच पोहरादेवी येथे मोठं शक्ती प्रदर्शन केलं.

क्लिक करा आणि वाचा- VIDEO: मुलींनी दिला आपल्या आईला खांदा; काळीज पिळवटून टाकणारी घटना

याच गडाच्या महंतांनी संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दबाव आणून मागणी केली होती. वेळोवेळी संजय राठोडांची पाठराखण करणाऱ्या या महंतांपैकी तीन जण शिवबंधन बांधणार आहेत व त्यांच्या सोबत समाजातील अनेक नेते आणि पन्नास ते साठ टक्के बंजारा बांधवही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या माहितीला सुनील महाराज यांनी दुजोरा दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- पावसाचा पुन्हा रौद्रावतार: पुराच्या पाण्यात ४ जण वाहून गेले; दोघांचे मृतदेह सापडले

कोण आहेत सुनील महाराज ?

सुनील महाराज हे पोहरादेवी गडाच्या पाच ते सहा प्रमुख महंतांपैकी ते एक आहेत. संत सेवालाल महाराजांचे वंशज म्हणून परिचित आहेत. बंजारा समाजात मोठा मान त्यांना आहे. त्यांनी याआधीही अनेक वेळा राजकीय विधानं केली आहेत. संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला क्लीन चीट कशी मिळाली?; समीर वानखेडेंनी पहिल्यांदाच दिलं थेट उत्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.