अल्पवयीन मुलांनी कबड्डीपटूला संपवले:कोयत्याने डोक्यात केले सपासप वार, सांगली येथील थरारक घटना; 5 मुले ताब्यात

अल्पवयीन मुलांनी कबड्डीपटूला संपवले:कोयत्याने डोक्यात केले सपासप वार, सांगली येथील थरारक घटना; 5 मुले ताब्यात

सांगली शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. सांगली येथील जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सांगली पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली येथील जामवाडी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय अनिकेत हिप्परकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंटचे काम करत होता तसेच तो एक कबड्डीपटू असून सार्वजनिक मंडळातही सक्रिय होता. हनुमान जयंतीच्यावेळी त्याच्या मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. यातून त्याने एका मुलाच्या कानाखाली देखील मारली होती. याचाच राग मुलांनी मनात ठेवला होता. जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ अनिकेत उभा असताना संशयित अल्पवयीन मुलांनी येऊन पूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारला. तेव्हा पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित अल्पवयीन मुलांनी अनिकेतवर कोयत्याने सपासप वार केले. कोयत्याच्या वारांमुळे अनिकेत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि आरोपी अल्पवयीन मुलांनी तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावव घेत तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांना श्वानपथकाद्वारे हल्लेखोरांना पकडण्यात यश सांगली शहर पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. पोलिसांनी त्वरित घटनास्थळाचा पंचनामा केला व लगेच आरोपींची श्वानपथकाद्वारे शोध मोहीम सुरू केली. हल्ल्यानंतर हल्लेखोर कर्नाळ रस्त्याकडे पळल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

​सांगली शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. सांगली येथील जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सांगली पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली येथील जामवाडी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय अनिकेत हिप्परकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंटचे काम करत होता तसेच तो एक कबड्डीपटू असून सार्वजनिक मंडळातही सक्रिय होता. हनुमान जयंतीच्यावेळी त्याच्या मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. यातून त्याने एका मुलाच्या कानाखाली देखील मारली होती. याचाच राग मुलांनी मनात ठेवला होता. जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ अनिकेत उभा असताना संशयित अल्पवयीन मुलांनी येऊन पूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारला. तेव्हा पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित अल्पवयीन मुलांनी अनिकेतवर कोयत्याने सपासप वार केले. कोयत्याच्या वारांमुळे अनिकेत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि आरोपी अल्पवयीन मुलांनी तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावव घेत तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांना श्वानपथकाद्वारे हल्लेखोरांना पकडण्यात यश सांगली शहर पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. पोलिसांनी त्वरित घटनास्थळाचा पंचनामा केला व लगेच आरोपींची श्वानपथकाद्वारे शोध मोहीम सुरू केली. हल्ल्यानंतर हल्लेखोर कर्नाळ रस्त्याकडे पळल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment