आमदार जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली ऑडिओ क्लिप:बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे याची हत्या झाली..
बदलापूरमधील 2 अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही हत्या झाली अशी ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केली आहे. यामुळे एन्काउंटर नेमका कसा झाला याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत म्हटलंय की, अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काउंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती, असे म्हणत आमदार आव्हाडांनी अक्षय शिंदे याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय? ऑडिओ क्लिपमधील कथित प्रत्यक्षदर्शी म्हणतोय की, अक्षय शिंदे ज्या पोलिस व्हॅनमध्ये होता, त्यामागेच त्याची गाडी होती. आमक्ही दोघे जण प्रवास करत होतो. आमच्या मागून पुढे गेलेल्या पोलिस व्हॅनला पडद्याने झाकण्यात आले होते. मात्र गाडी धावत असताना अचानक तीन मोठे आवाज झाले. मला वाटले की गाडीच्या काही पार्ट्सचा आवाज झाला असेल. त्यामुळे मी दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने मी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर झाल्याची बातमी पाहिली. मात्र मी भीतीपोटी कुणालाही याबाबत काहीच सांगितले नाही, पण तुम्हाला या बद्दल माहिती द्यावी असे वाटल्याने मी या प्रकरणी तुम्हाला मेसेज केले पण नंतर ते डिलीट केले, असे सांगत आहे.