आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर युवकांचा हल्ला; दगडी पाटाही उगारला:साइड न दाखवल्यावरून वाद, तिघांना घेतले ताब्यात; शिवसेना-वंचितच्या नेत्यांची धाव‎

आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर युवकांचा हल्ला; दगडी पाटाही उगारला:साइड न दाखवल्यावरून वाद, तिघांना घेतले ताब्यात; शिवसेना-वंचितच्या नेत्यांची धाव‎

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराजवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी नेकलेस रोडवर घडली. पृथ्वीराजवर दगडी पाटाही उगारण्यात आला. मात्र, काहींनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दुचाकीस्वाराने साइड न दाखवण्यावरून हा वाद झाला. पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांवर कारवाईसाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महानगरातील वाढत्या गुंडगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पृथ्वीराज देशमुख हा मित्रासोबत दुचाकीने नेकलेस रोडवरून जात होता. त्याच्या मित्राने दुचाकी आयटीआयकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ थांबवली. काही क्षणातच पृथ्वीचे आणखी मित्र तेथे आले. तेव्हढ्यात एक दुचाकीस्वार तेथे आला व पृथ्वीच्या मित्रांशी साइड न दाखवल्यावरून त्याने जाब विचारला. नंतर हे प्रकरण मिटले. त्याच वेळी जवळच राहणाऱ्या चार-पाच युवकांचे टोळके आले व पृथ्वी व त्याच्या मित्राशी वाद घातला. मध्यस्थीसाठी गेलेल्या पृथ्वीराजला या टोळक्याने जबर मारहाण केली. चेहऱ्याला मुका मार लागला. यातील एकाने थेट दगडी पाटाच पृथ्वीवर उगारला. मात्र, काहींनी मध्यस्थीने केल्याने भांडण मिटले. मुलावर हल्ला झाल्याची माहिती आ. देशमुख यांना मिळताच त्यांनी सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात धाव घेतली. शिवसैनिकही मोठ्या संख्येने पोहोचले. आधी आगामी विधानसभा निवडणुकीवर केली चर्चा; नंतर दोन्ही बाजूने वाद‎ आमदार पुत्राला झालेल्या मारहाणीत काही युवकांना पोलिसांना ताब्यात घेतल्याची माहिती एकाने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना शासकीय विश्रामगृहात दिली. काही वेळाने वंचितचे नेते अशोक सोनोने, राजेंद्र पातोडे, प्रमोद देंडवे व गजानन गवईंसह अन्य कार्यकर्ते सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात आले. तेथे आ. देशमुख, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, विकास पाटील, ज्ञानेश्वर म्हैसने आदी होते. आ. देशमुख व वंचितच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. आ. देशमुख व अशोक सोनोने यांनी निवडणूक लढण्याबाबत विचारपूसही केली. तेव्हढ्यात घटनास्थळी असलेला युवक आला व दोन्ही बाजूने वाद झाल्याचा दावा केला. मात्र आ. देशमुख यांच्या १६ वर्षाच्या मुलाला ३५-३६ वर्षांच्या व्यक्तींनी जबर मारहाण केली असून, काही वाईट घडले असते व हेच तुमच्या मुलासोबत झाले असते तुम्ही कोणती भूमिका घेतली असती, असा सवाल केला. आम्ही तक्रार केली, असेही ते म्हणाले. यावर ‘तेही तक्रार करतील’ असे वंचितचे कार्यकर्ते म्हणाले. त्यानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले. दोन्ही बाजूने वाद झाला. मात्र नंतर दोन्ही बाजूच्या मोठ्या नेत्यांनी मध्यस्थी केली. वंचितचे नेतेही कार्यकर्त्यांना सोबत घेत तेथून निघून गेले व शिवसैनिकही शांत झाले. परिणामी प्रकरण तेथेच मिटले.

​शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराजवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी नेकलेस रोडवर घडली. पृथ्वीराजवर दगडी पाटाही उगारण्यात आला. मात्र, काहींनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दुचाकीस्वाराने साइड न दाखवण्यावरून हा वाद झाला. पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांवर कारवाईसाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महानगरातील वाढत्या गुंडगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पृथ्वीराज देशमुख हा मित्रासोबत दुचाकीने नेकलेस रोडवरून जात होता. त्याच्या मित्राने दुचाकी आयटीआयकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ थांबवली. काही क्षणातच पृथ्वीचे आणखी मित्र तेथे आले. तेव्हढ्यात एक दुचाकीस्वार तेथे आला व पृथ्वीच्या मित्रांशी साइड न दाखवल्यावरून त्याने जाब विचारला. नंतर हे प्रकरण मिटले. त्याच वेळी जवळच राहणाऱ्या चार-पाच युवकांचे टोळके आले व पृथ्वी व त्याच्या मित्राशी वाद घातला. मध्यस्थीसाठी गेलेल्या पृथ्वीराजला या टोळक्याने जबर मारहाण केली. चेहऱ्याला मुका मार लागला. यातील एकाने थेट दगडी पाटाच पृथ्वीवर उगारला. मात्र, काहींनी मध्यस्थीने केल्याने भांडण मिटले. मुलावर हल्ला झाल्याची माहिती आ. देशमुख यांना मिळताच त्यांनी सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात धाव घेतली. शिवसैनिकही मोठ्या संख्येने पोहोचले. आधी आगामी विधानसभा निवडणुकीवर केली चर्चा; नंतर दोन्ही बाजूने वाद‎ आमदार पुत्राला झालेल्या मारहाणीत काही युवकांना पोलिसांना ताब्यात घेतल्याची माहिती एकाने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना शासकीय विश्रामगृहात दिली. काही वेळाने वंचितचे नेते अशोक सोनोने, राजेंद्र पातोडे, प्रमोद देंडवे व गजानन गवईंसह अन्य कार्यकर्ते सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात आले. तेथे आ. देशमुख, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, विकास पाटील, ज्ञानेश्वर म्हैसने आदी होते. आ. देशमुख व वंचितच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. आ. देशमुख व अशोक सोनोने यांनी निवडणूक लढण्याबाबत विचारपूसही केली. तेव्हढ्यात घटनास्थळी असलेला युवक आला व दोन्ही बाजूने वाद झाल्याचा दावा केला. मात्र आ. देशमुख यांच्या १६ वर्षाच्या मुलाला ३५-३६ वर्षांच्या व्यक्तींनी जबर मारहाण केली असून, काही वाईट घडले असते व हेच तुमच्या मुलासोबत झाले असते तुम्ही कोणती भूमिका घेतली असती, असा सवाल केला. आम्ही तक्रार केली, असेही ते म्हणाले. यावर ‘तेही तक्रार करतील’ असे वंचितचे कार्यकर्ते म्हणाले. त्यानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले. दोन्ही बाजूने वाद झाला. मात्र नंतर दोन्ही बाजूच्या मोठ्या नेत्यांनी मध्यस्थी केली. वंचितचे नेतेही कार्यकर्त्यांना सोबत घेत तेथून निघून गेले व शिवसैनिकही शांत झाले. परिणामी प्रकरण तेथेच मिटले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment