महायुतीत वाद:भाजप मावळमध्ये घड्याळाला नाही तर तुतारीला मदत करणार, आमदार सुनील शेळके यांच्या दाव्याने खळबळ
मावळ विधानसभेत भाजप गावोगावी फिरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही, असा प्रचार करत आहेत. पण शरद पवारांनी उमेदवार उभा केला तर हे तुतारीचा प्रचार करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा अजित पवार गटाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. दरम्यान आमदार सुनील शेळके म्हणाले की, भाजप पक्षाची काही मंडळी गावागावात जाऊन सांगत आहे, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना मदत करायची नाही, असे भाजपचे काही पदाधिकारी सांगत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नेमके सुनील शेळकेचे वक्तव्य काय? आमदार सुनील शेळके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी लोक अजित पवार आपल्यासोबत आल्याने महायुतीला फायदा होत आहे असे म्हटले. अजित पवारांसह स्थानिक आमदारांचे काम चांगेल आहे असे म्हणणारे लोकं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करत आहे. वेळप्रसंगी ते शरद पवारांच्या तुतारीला मदत करु शकतात असा गौप्यस्फोट आमदार शेळके यांनी केला आहे. काही जणांकडून अजितदादांविरोधात काम आमदार सुनील शेळके म्हणाले की,सध्या मावळमध्ये भाजपचे काही पदाधिकारी हे अजित पवार हे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मावळ गोळीबार अजित पवारांनी करायला लावला, अजित पवार कसे अन्याय करत आहेत, हे देखील सातत्याने दाखवले जात आहे. मावळ विधानसभा निवडणुकीत भाजपचे पराभूत उमेदवार देखील तयारी करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचे विद्यमान आमदार सुनील शेळके आपणच महायुतीचे उमेदवार असू हे ग्राह्य धरत मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे.