आमदार विनय कोरेंनी केला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा:सत्यजित पाटलांनी केली थेट ईडीकडे तक्रार
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी केला आहे. तसेच सत्यजित पाटील यांनी या संदर्भात थेट ईडीकडे तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. वारणा डेअरी अँड अॅग्रो इंडस्ट्री या कंपनीत आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे सत्यजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सत्यजित पाटील यांनी या संदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे त्याच सोबत पंतप्रधान कार्यालयाकडे सुद्धा विनय कोरे यांची ईडीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. विनय कोरे यांनी सुमारे अडीचशे कोटी रुपयांची मालमत्ता केवळ 29 कोटीमध्ये विकण्याचा घाट असल्याचा दावा सत्यजित पाटील यांनी केला आहे. दरम्यान, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना ही भेट झाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट घेतली असून शरद पवार यांनी सरूडकर यांना राजकीय मोर्चेबांधणीबाबत काही सूचना देखील दिल्या असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सत्यजित पाटील सरूडकर यांनी सांगितले, त्यानंतर शरद पवारांनी सरूडकर यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील सरूडकर अशी लढत होण्याची शक्यता आहे. ही लढत झाली तर या आजी-माजी आमदारांमध्ये ही चौथी लढत होईल. यापूर्वी विनय कोरे यांनी दोन वेळा विजय मिळवला आहे तर सत्यजित पाटील यांनी एकदा विजय मिळवला आहे. आता चौथ्या लढतीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.