नवी दिल्ली: Motorola Smartphones: गेल्या काही काळात स्मार्टफोन हॅकिंगचे प्रमाण वाढले असून अनेक युजर्सचे यामुळे नुकसान झाले आहे. यामुळे युजर्सचा वैयक्तिक डेटा तर हॅकर्सकडे जातोच. शिवाय, आर्थिक नुकसानं देखील होते. म्हणूनच फोन वापरतांना तो पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अशात तुम्ही मोटोरोलाचे स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. तीन Motorola स्मार्टफोनवर सायबर हल्ल्याचा धोका आहे जो युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनवर LTE नेटवर्क वापरण्यापासून प्रतिबंधित करतो. मोटोरोलाने त्याच्या- Moto G20, Moto E30 आणि Moto E40 – तीन स्मार्टफोन मॉडेल्समध्ये वापरलेली Unisoc चिप असुरक्षित आहे. Unisoc बजेट स्मार्टफोनमध्ये येतो ज्याचा बाजारातील महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. 2021 मध्ये ११ % च्या शेअरसह MediaTek, Qualcomm आणि Apple नंतर ही चौथ्या क्रमांकाची चिप बनवणारी कंपनी आहे. चेकपॉईंट रिसर्चच्या नुकत्याच आलेल्या अहवालात असे समोर आले आहे की, युनिसॉक चिप्समध्ये सुरक्षा बग आहे.

वाचा: Sunder Pichai : लाखो तरुणांचे फेव्हरेट Google चे सीईओ सुंदर पिचाई यांचे ‘मॉर्निंग रूटीन आहे खूपच सिम्पल, पाहा डिटेल्स

चिप्समध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी

सुरक्षा बगमुळे .स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका असल्याचेही सांगण्यात येत आहे. Unisoc T700 चिप गेल्या वर्षीपासून तीन Motorola डिव्हाइसेसमध्ये वापरली गेली आहे – Moto G20, Moto E30 आणि Moto E40. CVE-2022-20210 असे लेबल असलेल्या या चिप्समध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळून आल्या आहेत. चेकपॉईंटने युनिसॉकला गेल्या महिन्यात आधीच सूचित केले असून बग समोर आणला आहे.

वाचा: खूप खर्च न करता खरेदी करा ब्रँडेड Smart TV, Flipkart वर येतोय जबरदस्त सेल, पाहा ऑफर्स आणि सेल डेट

युनिसॉक-संचालित स्मार्टफोन वापरणाऱ्यांना असे सायबर हल्ले टाळण्यासाठी त्यांची डिव्हाइसेस नवीन OS आवृत्तीवर अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सायबर हल्ले टाळण्यासाठी अँड्रॉइड युजर्स सध्या करू शकतील असे काहीही नाही.

वाचा: Smartwatch: ब्लूटूथ कॉलिंगसह Noise ColorFit Pulse Buzz भारतात लाँच, वॉचमध्ये ७ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफSource link

Leave a Reply

Your email address will not be published.