मोदींच्या हस्ते पुण्यात विकासकामांचे ऑनलाइन उद्घाटन:लाडक्या बहिणी अन् भावांना माझा नमस्कार, पंतप्रधानांची मराठीतून भाषणाला सुरुवात
पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रो कॉरिडोरचे उद्घाटन तसेच स्वारगेट ते कात्रज पर्यंतच्या भूमिगत मार्गाचे भूमिपूजन आणि सोलापूर येथील विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाई करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांना माझा नमस्कार, असे मराठी भाषेत भाषणाला सुरुवात केली. मोदी म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मला अनेक कार्यक्रमांच्या उद्घाटन आणि लोकापर्णासाठी पुण्यात यायचे होते. मात्र पावसामुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यात माझेच नुकसान झाले. कारण पुण्यातील कणकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यात येणे ऊर्जावान बनवते. त्यामुळे मी आज पुण्यात येऊ शकलो नाही यात माझे मोठे नुकसान आहे. पण आज तंत्रज्ञानाच्या सहायाने आपल्या सर्वांना भेटण्याचे सौभाग्य मिळाले आहे. आज पुणे महाराष्ट्रातील नवीन अध्यायाची साक्ष बनत आहे. आता डिस्ट्रीक्ट कोर्ट ते स्वारगेटपर्यंतच्या सेक्शन मार्गाचे लोकार्पण झाले आहे. आता या मार्गावरही मेट्रो धावणार आहे. तसेच स्वारगेट ते कात्रजपर्यतच्या कामाचे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मेमोरियलचे भूमिपूजन करण्यात आले. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, आज विठ्ठलाच्या आशिर्वादाने त्यांच्या भक्तांना उपहार भेटले आहे. सोलापूरला एअर कनेक्टीव्हीला जोडण्यासाठी विमानतळाला अद्यावत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी प्रवाशांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता थेट सोलापूरला येता येणार आहे. यामुळे व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. या विकासकामांसाठी मी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देतो. बातमी अपडेट करत आहोत