मेक इन इंडिया:शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीमुळे गंुतवणुकीतून रोजगाराचा मंत्र – मोदी
शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीमुळे गुंतवणुकीतून रोजगाराचा मंत्र मिळाला अाहे. या वसाहतीमुळे रोजगारनिर्मिती आणि निर्यातीला चालना मिळेल. तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊन बिडकीन औद्योगिक केंद्र दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला.
पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी राज्यातील ११,२०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण तसेच भूमिपूजन झाले. यात छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा-बिडकीन अाैद्योगिक क्षेत्र तसेच पुणे मेट्रो फेज वन आणि सोलापूर विमानतळाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन, तर भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन केले त्या वेळी मोदी बोलत होते. फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेल्या शेंद्रा-बिडकीन (आॅरिक) औद्योगिक क्षेत्राचे काम मध्येच बंद पडले होते. शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार अाल्यानंतर त्याला चालना मिळाली. राज्याच्या प्रगतीसाठी विकासाला प्राथमिकता देणाऱ्या सरकारची निरंतर आवश्यकता असते. जेव्हा यामध्ये अडथळा येतो तेव्हा महाराष्ट्राला मोठे नुकसान सहन करावे लागते, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारचे नाव न घेता केली. मागील सरकारच्या काळात विकास ठप्प झाला होता. तो महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार येताच महायुतीच्या काळात सुरू झाला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सुमारे २८ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेससह राज्यातील अाघाडी सरकारच्या काळातील गलथान कारभारावर जोरदार टीका केली. मागील काही दशकांपासून नियोजन आणि दृष्टिकोनाचा अभाव राहिला. एखादी योजना चर्चेत आल्यानंतर तिची फाइल अनेक वर्षे अडकून पडायची. एखादी योजना बनली तरी एक-एक प्रकल्प अनेक दशकांपर्यंत लटकून पडायचा. त्या जुन्या कार्यपद्धतीमुळे देश-महाराष्ट्राचे मोठे नुकसान भोगावे लागले, असे सांगून त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर हल्लाबोल केला. पुणे येथील मुख्य समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरात हा कार्यक्रम ऑरिक हॉलमधून वेबकास्ट करण्यात आला. या वेळी गृहनिर्माण आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड आणि इतर अनेक जण उपस्थित होते. ३ वर्षांत १८२२ एकरांवरचे ३८ औद्योगिक आणि मिश्र-वापर झोनसाठी वितरित करण्यात आले. ७८५५ एकरची शेंद्रा-बिडकीन अौद्योगिक वसाहत
मन की बात – लोकांना सकारात्मक गोष्टी आवडतात हे सिद्ध : मोदी
नवी दिल्ली| एखादी गोष्ट मसालेदार किंवा निगेटिव्ह असल्याशिवाय त्याकडे लक्ष जात नाही असा सर्वसाधारण समज आहे. पण देशातील जनता सकारात्मक माहितीसाठी किती भुकेली आहे हे ‘मन की बात’ने सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाच्या ११४ व्या भागात केले. लोकांना सकारात्मक गोष्टी, प्रेरणादायी उदाहरणे, उत्साहवर्धक कथा आणि गोष्टी आवडतात. चकोर पक्ष्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, चकोर पक्ष्याप्रमाणेच लोक देश आणि लोकांच्या सामूहिक कामगिरीबद्दल अभिमानाने ऐकतात,असे मोदी यांनी सांगितले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन