मुंबई : मोहम्मद शमी हा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. शमीच्या गोलंदाजीच्या जोरावरच भारतीय संघ आता वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. पण शमीने एकदा क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता. पण शमीच्या करीअरमध्ये नेमका कोणता टर्निंग पॉइंट आला, हे आता समोर आले आहे.शमीच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. पण शमी या सर्व गोष्टींना धीराने सामना देत होता. पण हा सर्व संघर्ष सुरु असताना एक गोष्ट अशी घडली की, त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट घडली ती २०१८ साली. त्यावेळी भारतीय संघ इंग्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज होत होता. या मालिकेपूर्वी भारतीय संघाची यो यो चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत शमी नापास ठरला होता. शमीच्या खासगी आयुष्यात अजून काही वाईट गोष्टी सुरु होत्या. त्यामुळे शमी निराश झाला होता. शमी यावेळी स्वत:वरच रागावला होता आणि त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय शमीने त्यावेळचे गोलंदाजी प्रशि७क अरुण यांना सांगण्याचा निर्णय घेतला होता. शमी अरुण यांच्या रुममध्ये गेला आणि आपण क्रिकेट सोडणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर अरुण यांनी शमीला प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे नेले. अरुण शास्त्री यांना म्हणाला की, ” शमी असं म्हणतोय की त्याला क्रिकेट सोडायचं आहे.” त्यावर शास्त्री यांनी काही प्रश्न शमीला विचारले. शास्त्री म्हणाले की, ” जर तु क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहेस, तर तु काय करणार आहेस. क्रिकेट सोडून अजून कोणत्या गोष्टी तुला येतात. तुला जे्हा चेंडू दिला जातो तेव्हा नेमकी कशी गोलंदाजी करायची हे तुला चांगले माहिती आहे. त्यामुळे क्रिकेट सोडून तु काय करणार, हेच तुझे करीअर आहे.” त्यानंतर शमीला संघात स्थान मिळाले नाही, त्याच्या जागी नवदीप सैनीला भारतीय संघात स्थान देण्यात आले. पण शमीला संघात स्थान मिळाले नसले तरी त्याला शास्त्री यांनी घरी पाठवले नाही. शास्त्री यांनी शमीला त्यावेळी बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले. या अकादमीमध्ये शमीने सराव केला आणि तिथे तो अजून कणखर बनला. शमीने तिथे चांगला सराव तर केलाच पण आपल्या फिटनेसवर जास्त भर दिला. त्यानंतर शमीला जेव्हा भारतीय संघात स्थान देण्यात आले तेव्हा कसोटी मालिकेत त्याने १६ विकेट्स मिळवले होते. त्यानंतर शमीने आपल्या करीअरमध्ये मागू वळून पाहिलेच नाही.शमीच्या आयुष्यात २०१८ साली कठीण काळ होता. पण शमी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला आणि तोच त्याच्या करीअरचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *