पावसाळ्यात सर्व वातारण अगदी प्रसन्न झालेले असते. पण वातावरण बदलले की त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरिरावर होत असतो. पावसाळ्यात त्वचेमधील बेसिक क्लीनिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग कमी होते.

पाऊस पाडू लागल्यानंतर आपण कधी चहा भजी, तर कधी गरम गरम समोसे, पकडो खातो पण या सर्वांचा अपल्या त्वचेवर खूप परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात घाम आणि आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर मुरुम येणे किंवा डाग येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. पण घरात काही उपाय केल्याने तुम्ही त्वचेवरील समस्या तोडगा काढू शकता.
(फोटो सौजन्य :- टाइम्स ऑफ इंडिया)

त्वचा कोरडी ठेवा

पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे त्वचेला पुन्हा पुन्हा घाम येऊ लागतो. यामुळे अनेक वेळा तुम्हाला पिंपल्सच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत त्वचा कोरडी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार डस्टिंग पावडर वापरू शकता. घामाची समस्या दूर करण्यासोबतच आर्द्रताही दूर ठेवते. ही पावडर वापरताना तुमच्या त्वचेप्रमाणे पावडची निवड करा. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.

(वाचा :- फक्त २ मिनिटं आणि तुमच्या काळवंडल्या चेहऱ्याला द्या नवी चमक)

पावसाळ्यातही लावा सनस्क्रीन

पावसाळ्यात काही लोक सनस्क्रीन लोशन लावणं बंद करतात. पण असं न करता तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार 15 ते 50 SPF असलेले सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचेवर एक थर तयार होतो. त्याच प्रमाणे त्वचेचे घातक घटकांपासून सौरक्षण होते. त्याच प्रमाणे रात्री व्हिटॅमिन सी चे सिरम देखील तुम्ही लावू शकता.

(वाचा :- Skin care : आता ब्यूटी पार्लरचे हजारो रुपये वाचणार!, घरच्या घरी अशा पद्धतीने करा ‘सॉफ्ट हेयर वॅक्स’)

डोळ्यांखालील भागाकडे लक्ष द्या

चेहऱ्याकडे लक्ष गेल्यावर पहिली नजर डोळ्यांकडे जाते. अशात तुमच्या डोळ्यांखालील भागांवर जास्त लक्ष द्या. जर हा भाग काळा किंवा गडद वाटत असेल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या लूक्सवर होत असतो. त्यामुळे डोळ्यांखालील भागाकडे लक्ष द्या. यासाठी सॅलड्स, फळे, भाज्यांचे रस असलेले पदार्थ खा.

(वाचा :- 5 Hair Mask : केस स्वस्तात करून हवेत एकदम स्ट्रेट, मऊशार व चमकदार? मग घरच्या घरी करायला घ्या ‘ही’ 5 कामे..!)

योग्य फेस ऑइल वापरा

पावसाळ्यात योग्य मॉइश्चरायझर किंवा स्किन ऑइलचा वापर केल्याने त्वचा निरोगी आणि ग्लोइंग होते. त्वचेसाठी तेल म्हणून तुम्ही जोजोबा तेल वापरू शकता. त्याच प्रमाणे तुम्ही बेबी ऑइलचा देखील पर्याय निवडू शकता. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. तेलामुळे त्वचेला हवे तसे पोषण मिळते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत ओळखून ऑइलची निवड करा.

(वाचा :- Happy birthday sonam kapoor : ३७ व्या वर्षीही तरुण दिसते सोनम कपूर, जाणून घ्या तिच्या सुंदर त्वचेचे गुपित)

त्वचा योग्य प्रकारे स्वच्छ करणे

पावसाळ्यात तुमची त्वची तजेलदार दिसण्यासाठी दिवसातून दोन वेळा तुम्ही क्लींजिंग करणं गरजेचं आहे. या काळातही जर तुम्हाला ग्लोइंग त्वचा हवी असेल तर सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ साफ करुन घेणं गरजेच असते. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार कोणताही फेसवॉश वापरू शकता. तेलकट त्वचेसाठी कडुलिंब, ग्रीन टी किंवा टी ट्री फेसवॉश सर्वोत्तम मानला जातो.

(वाचा :- Hair Care Tips : केसातील कोंड्याने हैराण झाले आहात? मग तज्ञांनी सांगितलेले हे आयुर्वेदिक उपाय करुन पाहाच)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.