Side Effects of Moong Dal : कायमच चांगल्या आरोग्यासाठी डाळींचे सेवन करणे गरजेचे असते. डाळींमध्ये सर्व प्रकारचे पोषणतत्व आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. पचनाची समस्या असेल किंवा अगदी कोणत्याही आजारपणात मूग डाळीची खिचडी सकस आहार म्हणून दिली जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का? मूग डाळही काही लोकांसाठी घातक असते.

तज्ञांच्या माहितीनुसार, मूगडाळ काही लोकांसाठी नुकसानदायी आहे. मूगडाळीचे काही लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. या लोकांना मूगडाळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी मूगडाळ खाणं टाळावं. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​मूगडाळीचे फायदे

एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मूग डाळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक ऍसिड, ऑरगॅनिक ऍसिड, अमिनो ऍसिड, कार्बोहायड्रेट्स आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेले लिपिड्स यांसारखे पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात.

याव्यतिरिक्त, मूग डाळीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीडायबेटिक, अँटीहाइपरटेन्सिव्ह आणि ट्यूमर गुणधर्म असतात, जे अनेक रोग बरे करण्यास मदत करतात. फायबर आतड्यांतील घाण काढून टाकण्यास मदत करते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम करते. तुम्ही तुमच्या आहारात मूग डाळ अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. जसे मसूर, कोंब, खिचडी, हलवा इ.

(वाचा – Monkeypox Prevention : भारतीय डॉक्टरांनी मंकीपॉक्सपासून वाचण्याचे सांगितले, ६ अतिशय सोपे उपाय

​मूगडाळीमुळे एनर्जी वाढते

मुगाच्या डाळीमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि प्रथिने यांसारखे घटक आढळतात, जे शरीरातील कमजोरी दूर करण्यास आणि ऊर्जा वाढविण्यास मदत करतात. जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा मूग डाळीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. मूग डाळीचे सेवन शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करू शकते.

(अंगात १०३ डिग्री ताप, Monkeypox च्या जाळ्यात अडकलेल्या सेक्सुअल हेल्थ वर्करचा अनुभव अंगावर शहारा आणेल)

​यूरिक ऍसिडची समस्या असेल तर मूगडाळ टाळा

ज्या लोकांच्या शरीरात यूरिक ऍसिडची मात्रा सर्वाधिक असते. अशा लोकांनी मूगडाळ अजिबात खाऊ नये. त्यांच्या आरोग्यासाठी मूगडाळ ठरते घातक. मूगडाळीमुळे युरिक ऍसिडची मात्रा शरीरात वाढते.

(वाचा – डेंग्यूमध्ये पोटात का दुखतं? यामागचं कारण अतिशय महत्वाचं; दुर्लक्ष कराल तर जिवावर बेतेल))

​पोट फुगण्याची समस्या

जर एखाद्या व्यक्तीला ब्लोटिंग किंवा पोट फुगण्याची समस्या असेल तर त्या व्यक्तीने मुगाची डाळ खाऊ नये. कारण मूगडाळीत शॉर्ट चेन कर्ब्स असते. जे पचनासाठी घातक असते. ज्यांना पचनाची समस्या असते त्यांनी मूगडाळ खाऊ नये.

(वाचा – पावसाळ्यात योनिमार्गातील यीस्टचा संसर्ग कसा टाळावा? जाणून घ्या हे 7 महत्त्वाचे उपाय))

​ब्लडप्रेशर आणि डायबिटिजची समस्या

अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. त्यांच्यासाठी मूग डाळीचे सेवन करणे योग्य असल्याचे सांगितले जाते. परंतु ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी मूग डाळीचे सेवन टाळावे. दुसरीकडे, जर तुम्हाला कमी मधुमेहाची समस्या असेल तर त्यांनी देखील मूग डाळ खाऊ नये. हे हानिकारक असू शकते.

अनेक लोक इतर डाळींच्या तुलनेत मूग डाळ उत्तम मानतात. पण ज्यांना यूरिक ऍसिड, रक्तदाब, पोट फुगणे किंवा कमी रक्तातील साखरेची समस्या आहे, त्यांना मूग डाळ खूप नुकसान करू शकते.

(वाचा – Diabetes and Frozen Shoulder:डायबिटीजमुळे खांदे दुखीचा त्रास होतो; हे १० उपाय सांध्यांचं दुखणं करतील गायब))Source link

Leave a Reply

Your email address will not be published.