परभणी : नदीवर पूल नसल्यामुळे, रुग्णवाहिका गावात जात नसल्याने चक्क बैलगाडीत मृतदेह टाकून गावांमध्ये नेण्याची वेळ परभणीच्या सेलू तालुक्यातील नरसापुर येथील ग्रामस्थांवर आली आहे. पुला अभावी मृत्यूनंतरही मरण यातना संपत नसल्याचा हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सेलू तालुक्यातील नरसापुर गावाजवळून वाहणाऱ्या करपरा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अशातच गावातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावाकडे आणण्यात आला. मात्र, नदीवर पूल नसल्याने आणि चिखलामुळे रुग्णवाहिका गावात जात नसल्याने चक्क बैलगाडीतून मृतदेह गावाकडे नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

धारावीत सदा सरवणकरांच्या बैठकीनंतर राडा; ठाकरे समर्थक ३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
मागील वर्षी देखील सप्टेंबर महिन्यामध्ये मृतदेह बैलगाडीमध्ये टाकून नेण्याची वेळ नरसापुर ग्रामस्थांवर आली होती. गावा शेजारून वाहणाऱ्या करपा नदीवर पूल नसल्याने दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशा समस्येला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. यासोबतच रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मात्र, कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेतलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाग येत नाही. त्यामुळे या प्रकारानंतर तरी जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्या, ग्रामस्थांनी या नदीवर पूल उभारावा अशी मागणी अनेक वेळा प्रशासनाकडे केली आहे. मात्र मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सहा वर्षाची चिमुकली मध्यरात्री झोपेतून उठली; नंतर जे झाले त्याने गावावर शोककळा पसरलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.