रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या आंजणारी येथील काजळी नदीत टँकर कोसळून चालकाचा मृत्यू मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. एलपीजी टँकर नदीत पडून चालक अडकून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर कठडा तोडून नदीत कोसळला. लांजा पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल या अपघातात टँकरच्या मागून एलपीजी गॅसची गळती सुरू होती. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक दवधे मार्गे काहीवेळ वळवण्यात आला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई गोवा महामार्ग रात्रभर बंद ठेवण्यात येणार आहे. (Due to the accident in Ratnagiri, the Mumbai-Goa highway will remain closed overnight)

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथील अंजनारी पुलावरून एल पी जी गॅस चा टँकर नदीत पलटी झाला आहे. यामध्ये चालक जागीच मृत्यू पावला आहे. याठिकाणी वाहतूक पोलिस, लांजा पोलिस ,रुग्णवाहिका तसेच हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. यामध्ये टँकरची गॅस गळती सुरू असून सद्यस्थितीत एलपी गॅस कंपनीचे अधिकारी घटना स्थळी पोहचले आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे महामार्ग वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक श्री घोसाळे, पोलीस हवालदार पावसकर, पोलीस हवालदार श्री पवार ,श्री भरणकर, श्री संसारे याबरोबरच हॅन इन्फ्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी आणि श्यामकुमार गिरी, क्रेन घटनास्थळी दाखल झाले. टॅंकरखाली अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी लांजा वाहतूक पोलिस मुजावर, लांजातील तरुण रणजित सार्दळ तसेच महामार्ग वाहतूक पोलिस यांनी प्रयत्न केले. त्यानंतर ट्रेनच्या सहाय्याने सायंकाळी ४.३० वाजता टॅंकर बाजूला करुन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

नदीत पडल्याने या गॅस टँकरला पाठीमागून गळती सुरू झाली होती. त्यामुळे या ठिकाणी संबंधित सुरक्षा अधिकारी दाखल झाले होते. तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक देवधे काजरघाटी मार्गे रत्नागिरी व दाभोळे साखरपा या पर्यायी मार्गाने वळविली होती.

त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची गंभीरता पाहता मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. तज्ञांची टीम गोवा आणि उरण येथून घटनास्थळी येईल. त्यांच्याकडून अपघातग्रस्त टँकरमधला गॅस सुरक्षितरित्या बाहेर काढला जाईल आणि त्यानंतरच वाहतूक पूर्वपदावरती येईल. काळजी करण्याची गरज नसली तरी संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.