नवी दिल्ली:Moto G82 5G First Sale: मोटोरोलाने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Moto G82 5G ला लाँच केले होते. आजपासून या (१४ जून) फोनची विक्री सुरू झाली आहे. ग्राहक स्मार्टफोनला ई-कॉमर्स साइट Flipkart वरून खरेदी करू शकतात. या फोनची सुरुवाती किंमत २१,४९९ रुपये आहे. याशिवाय, पहिल्या सेलमध्ये फोनला खरेदी केल्यास वेगवेगळ्या ऑफर्सचा देखील तुम्हाला फायदा मिळेल. Moto G82 5G स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. Moto G82 5G स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Father’s Day ला वडिलांना गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे ‘हा’ स्मार्टफोन; किंमत कमी फीचर्स जबरदस्त

Moto G82 5G स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G82 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच फुलएचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे व pOLED स्क्रीन सपोर्टसह येतो. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह Qualcomm Snapdragon ६९५ ५G प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. Moto G82 5G मध्ये रियरला सिंगल एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा समावेश आहे. यामध्ये रियर कॅमेरा HDR, नाइट व्हिजन, प्रो मोड, ५०M हाय रिझॉल्यूशन मोड, फोटो सॉलिड, ड्यूल कॅमेरा बोकेह, सुपर रिझॉल्यूशन, गूगल लेंस इंटिग्रेशन, सुपर नाइट सेल्फी आणि व्हिडिओ स्टेबलाइजरसह अनेक फीचर्स दिले आहेत.

वाचा: Recharge Plans: दरमहिन्याला रिचार्जचे टेन्शन विसरा! वर्षभराच्या ‘या’ प्लानमध्ये मिळेल डेटा-कॉलिंगसह हॉटस्टार एकदम फ्री

Moto G82 5G ची किंमत आणि ऑफर्स

Moto G82 5G ची विक्री आजपासून ई-कॉमर्स फ्लिपकार्टच्या माध्यमातून सुरू झाली आहे. फोनची सुरुवाती किंमत २१,४९९ रुपये आहे. परंतु, एसबीआय क्रेडिट कार्ड व ईएमआय ट्रांजॅक्शनवर १५०० रुपये इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळाल्यास डिव्हाइसची किंमत १९,९९९ रुपये होईल. याशिवाय, फोनवर १२,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळत आहे. दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास Moto G82 5G ची किंमत अजूनच कमी होईल.

वाचा: अरेच्चा! मनुष्याप्रमाणे विचार करू शकते Google चे AI चॅटबॉट, इंजिनिअरची नोकरी धोक्यातSource link

Leave a Reply

Your email address will not be published.