राष्ट्रीय शेअर बाजाराचा NSE निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा BSE सेन्सेक्स रविवार, १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर एक तासासाठी सुरू होईल.
शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय?
एनएसईने दिलेल्या माहितीनुसार शेअर बाजारात १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७.१५ या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होईल. दिवाळीच्या निमित्ताने मुहूर्त ट्रेडिंग सत्रात प्री-ओपन सेशनसाठी ८ मिनिटांची विंडो असेल जी संध्याकाळी ६ ते ६.०८ या वेळेत होईल. तर ब्लॉक डील विंडो ५:४५ वाजता उघडेल, त्यानंतर सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत बाजाराचे सामान्य सत्र सुरू होईल आणि ७.२५ वाजेपर्यंत व्यापारात बदल करण्याची परवानगी असेल.
यानंतर क्लोझिंग सत्र ७:२५ ते ७:३५ पर्यंत असेल. ब्लॉक डील सत्र १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५:४५ ते ६ या वेळेत होईल. दुसरीकडे, कॉल लिलाव इलिक्विड सत्र संध्याकाळी ६:२० ते ७:०५ दरम्यान आयोजित केले जाईल.
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारातील ट्रेडिंग दरम्यान व्यापारी आणि गुंतवणूकदार नवीन वर्षात समृद्धी मिळविण्यासाठी प्रतीकात्मक व्यवहार करतात. हे अध्यात्म आणि वित्त यांचे अनोखे मिश्रण आहे, कारण या शुभ मुहूर्तावर ट्रेंड केल्याने वर्षभर संपत्ती आणि यश खेळत राहते असा अनेकांचा विश्वास आहे. नवीन आर्थिक वर्षाची सकारात्मक सुरुवात म्हणून मुहूर्त ट्रेडिंगकडे पाहिले जात आहे. भारतीय शेअर बाजारात ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे.