तसेच बाजारात बऱ्याच काळापासून गुंतवणूक करणारे या दिवशी आपले नशिब चमकावण्याच्या हेतूने स्टॉक खरेदी करतात. एकूणच या २४ तासात शेअर बाजारात मोठा उत्साह असतो. परंतु मुहूर्ताच्या व्यापारात उत्साहाने गुंतवणूक करताना विशेषतः नव्या गुंतवणूकदारांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
आर्थिक उद्दिष्टे ठरवा
मुहूर्त ट्रेडिंग सत्रादरम्यान तुम्ही गुंतवणूक करताना तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजेच मुहूर्त ट्रेडिंगमध्ये तुम्ही जे ट्रेडिंग करणार आहात त्याचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे. तसेच तुम्ही बाजारात नवीन शेअर्स खरेदी करत असाल तर किती दिवसांसाठी – दीर्घ मुदत, मध्य मुदत किंवा अल्प मुदतीसाठी आहे हे मुद्दे स्वतःला काळजीपूर्वक विचारा.
मजबूत कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा
मुहूर्त ट्रेडिंगची वेळ मर्यादित असते, त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर्स खरेदी करणार असाल तर विचारपूर्वक अशा कंपन्यांचा शोध घ्या ज्याचे शेअर्स तुम्हाला दीर्घ मुदतीत चांगला परतावा देतील आणि मुळात मजबूत आहेत.
म्हणजेच आगामी काळात त्यांचा व्यवसाय चांगला असावा म्हणजे कंपनीच्या भरभराटीची शक्यता कायम राहील. या सर्व बाबींची पूर्तता कंपनी करते हे इतिहासात दिसून आले तरच त्या कंपनीचे शेअर्स नेहमीच चांगली कामगिरी करतील.
पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा
तुमचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण करा म्हणजेच तुमचे सर्व भांडवल एका शेअर किंवा एकाच मालमत्ता वर्गात गुंतवू नका. सोप्या भाषेत बोलायचे तर तुमच्याकडे ५०,००० रुपये भांडवल असेल तर ते फक्त IT संबंधित शेअर्समध्ये गुंतवू नका आणि त्याची विविध क्षेत्रातील समभागांमध्ये किंवा इतर मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करा. यामुळे बाजारातील मंदीच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओचे कमी नुकसान होईल.
ब्रोकरेजचा सल्ला धान्यात ठेवा
दिवाळीनिमित्त ब्रोकरेज हाऊसेस आणि मार्केट तज्ञ त्यांच्या आवडत्या स्टॉक्सबद्दल अहवाल प्रसिद्ध करतात. हे अहवाल दरवर्षी नवीन संवत आणि मुहूर्त ट्रेडिंगच्या आधी प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे ब्रोकरेजचा सल्ला धान्यात घेऊन एक तासाच्या व्यापार दरम्यान गुंतवणुकीचा निर्णय घ्या.
दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा
लक्ष्मीपूजनच्या निमित्त शेअर बाजारात केवळ एका तासासाठी उघडते. म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग केवळ एका तासासाठी असते. त्यामुळे कमी वेळात परताव्याच्या मागे धावून घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेऊ नका आणि मीडियम ते लाँग टर्मच्या मुदतीची गुंतवणूक लक्षात ठेवूनच इन्व्हेस्ट करा. तसेच पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक टाळा.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याच्या अधीन आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)