जळगाव: जिल्ह्यातील शिरसोली रस्त्यावर असणाऱ्या रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकाला तरुणांनी दिला बेदम चोप दिला आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जळगाव शिरसोली रस्त्यावर असलेल्या महाविद्यालय परिसरामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. एक रिक्षावाला त्याच्या रिक्षामध्ये बसून विद्यार्थ्यांचे फोटो काढण्याचे काम करत होता. हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
कापसाला कमी भावाची हमी; गुन्हे टाळण्यासाठी व्यापाऱ्यांची पत्र युक्ती, शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ७०० रुपयांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, रायसोनी इन्स्टिट्यूटची विविध महाविद्यालये शिरसोली रस्त्यावर आहे. या महाविद्यालयात शेकडो मुले मुली प्रवेशित आहेत. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून मुले-मुलींसाठी महाविद्यालयाची बस नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. बसअभावी विद्यार्थ्यांना रिक्षाचाच पर्याय आहे. याचाच एका तांबापुरा येथील रिक्षाचालकाने गैरफायदा घेत काही दिवसांपासून तो महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे फोटो काढत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता काही तरुणांना माहिती मिळताच त्यांनी या रिक्षाचालकांचा मोबाईल तपासला. त्यात त्यांना आणखी काही मुलींचे फोटो दिसले.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस साजरा

यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी रिक्षा चालकाला चोप दिला. तसेच, त्याच्या रिक्षाची प्रचंड तोडफोड करून ती महाविद्यालयासमोरच उलटून दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणून त्यांनी रिक्षाचालकाला पोलीस ठाण्यात नेले आहे. दरम्यान, यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *