महंत रामगिरी महाराज यांचे व्हिडिओ काढून टाका:मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र पोलिसांना महंत रामगिरी महाराज यांचे व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या न्यायपीठाने वकील एजाज नक्वी यांनी केलेल्या विनंतीवर पोलिसांना या संबंधीचे तोंडी आदेश दिले आहेत. ज्यामध्ये त्यांनी निदर्शनास आणले की ‘वादग्रस्त’ व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वत्र आहे आणि त्यामुळे जातीयवाद निर्माण होऊ शकतो. तसेच समाजात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. एफआयआरची चौकशी करण्याचे आदेश या संबधी न्यायालयाने म्हटले की, योग्य पावले उचला आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ हटवले जातील याची खात्री करा. न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी पोलिसांची बाजू मांडलेल्या अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांना हे तोंडी आदेश दिले आहेत. न्यायपीठाने शिंदे यांना वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकण्यासाठी पोलिस विभागाच्या सायबर सेल शाखेची मदत घेण्याचे आणि महंत रामगिरी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक प्रथम माहिती अहवालांची म्हणजेच एफआयआरची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

व्हिडिओंमुळे ‘अशांतता’ निर्माण होण्याची शक्यता

या संदर्भात वकील नक्वी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार, सिन्नर तालुक्यातील एका कार्यक्रमात रामगिरी महाराज यांनी प्रेषित मुहम्मद आणि त्याच्या सहा वर्षांच्या मुलीशी असलेल्या कथित संबंधांबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच राज्यभर निषेध व्यक्त करण्यात आला. व्हिडिओंमुळे ‘अशांतता’ निर्माण होण्याची शक्यता त्यांनी ठळकपणे मांडली आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही न्यायालयाला सांगितले. तसेच आक्षेपार्ह टिप्पण्यांविरोधात काही लोक ‘उपोषणाला बसले आहेत’ तसेच दुसऱ्या एका याचिकेत उपस्थित असलेल्या वकिलाने रामगिरी महाराज यांना अटक करण्याची विनंती केली. महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 58 एफआयआर दाखल दरम्यान, सरकारी वकील शिंदे यांनी न्यायपीठाला सांगितले की, रामगिरी महाहराज यांच्या विरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 58 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व 58 एफआयआर एकत्र केल्या गेल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास जिथे ही घटना घडली त्या सिन्नरमधील एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आला आहे. त्या नुसार या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… अजित पवार गटाची तातडीची बैठक:जागा वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता; पवारांसह पटेल, तटकरे यांची उपस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीमध्ये महायुतीतील जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार गट हा 60 ते 80 जागांसाठी आग्रही असून महायुतीमध्ये त्यांना 50 जागा मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. पूर्ण बातमी वाचा… शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये:आणखी एका पुतळ्यावरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल; पवार, राणेंवरही टीका छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रत्येक जण हा भारतीय जनता पक्षाचा प्रोडक्ट असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मुंबईत देखील शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावरील पुतळा झाकून ठेवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मालवण येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील आरोपी हा वर्षा बंगल्यावर लपून बसला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. लाडक्या उद्योगपतींनी शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा… मनोज जरांगे पाटील यांची मोर्चेबांधणीला सुरुवात:विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी पुण्यात महत्त्वाची बैठक विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ते आज 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली. पूर्ण बातमी वाचा… महामहोपाध्याय फडणवीसकृत शिवरायांचा नवा अपमान:थेट हल्ला करत ठाकरे गटाकडून फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र पोलिसांना महंत रामगिरी महाराज यांचे व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या न्यायपीठाने वकील एजाज नक्वी यांनी केलेल्या विनंतीवर पोलिसांना या संबंधीचे तोंडी आदेश दिले आहेत. ज्यामध्ये त्यांनी निदर्शनास आणले की ‘वादग्रस्त’ व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वत्र आहे आणि त्यामुळे जातीयवाद निर्माण होऊ शकतो. तसेच समाजात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. एफआयआरची चौकशी करण्याचे आदेश या संबधी न्यायालयाने म्हटले की, योग्य पावले उचला आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ हटवले जातील याची खात्री करा. न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी पोलिसांची बाजू मांडलेल्या अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांना हे तोंडी आदेश दिले आहेत. न्यायपीठाने शिंदे यांना वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकण्यासाठी पोलिस विभागाच्या सायबर सेल शाखेची मदत घेण्याचे आणि महंत रामगिरी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक प्रथम माहिती अहवालांची म्हणजेच एफआयआरची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

व्हिडिओंमुळे ‘अशांतता’ निर्माण होण्याची शक्यता

या संदर्भात वकील नक्वी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार, सिन्नर तालुक्यातील एका कार्यक्रमात रामगिरी महाराज यांनी प्रेषित मुहम्मद आणि त्याच्या सहा वर्षांच्या मुलीशी असलेल्या कथित संबंधांबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच राज्यभर निषेध व्यक्त करण्यात आला. व्हिडिओंमुळे ‘अशांतता’ निर्माण होण्याची शक्यता त्यांनी ठळकपणे मांडली आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही न्यायालयाला सांगितले. तसेच आक्षेपार्ह टिप्पण्यांविरोधात काही लोक ‘उपोषणाला बसले आहेत’ तसेच दुसऱ्या एका याचिकेत उपस्थित असलेल्या वकिलाने रामगिरी महाराज यांना अटक करण्याची विनंती केली. महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 58 एफआयआर दाखल दरम्यान, सरकारी वकील शिंदे यांनी न्यायपीठाला सांगितले की, रामगिरी महाहराज यांच्या विरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 58 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व 58 एफआयआर एकत्र केल्या गेल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास जिथे ही घटना घडली त्या सिन्नरमधील एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आला आहे. त्या नुसार या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… अजित पवार गटाची तातडीची बैठक:जागा वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता; पवारांसह पटेल, तटकरे यांची उपस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीमध्ये महायुतीतील जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार गट हा 60 ते 80 जागांसाठी आग्रही असून महायुतीमध्ये त्यांना 50 जागा मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. पूर्ण बातमी वाचा… शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये:आणखी एका पुतळ्यावरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल; पवार, राणेंवरही टीका छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रत्येक जण हा भारतीय जनता पक्षाचा प्रोडक्ट असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मुंबईत देखील शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावरील पुतळा झाकून ठेवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मालवण येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील आरोपी हा वर्षा बंगल्यावर लपून बसला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. लाडक्या उद्योगपतींनी शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा… मनोज जरांगे पाटील यांची मोर्चेबांधणीला सुरुवात:विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी पुण्यात महत्त्वाची बैठक विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ते आज 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली. पूर्ण बातमी वाचा… महामहोपाध्याय फडणवीसकृत शिवरायांचा नवा अपमान:थेट हल्ला करत ठाकरे गटाकडून फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment