नवी दिल्ली : रोहित शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर रोहित शर्माने आपले अर्धशतकही साजरे केले. रोहितच्या या अर्धशतकानंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मुंबई इंडियन्यची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे.रोहित शर्मासाठी हा सामना खास ठरला. या सामन्यात रोहित कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात रोहित लवकर बाद झाला होता. पण या सामन्यात मात्र रोहितने आपली चुक सुधारली. रोहितने यावेळी सुरुवातीला सावधपणे खेळ केला आणि सेट झाल्यावर रोहितने पाकिस्तानच्या गोलंदाजीची पिसे काढली. रोहितने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. रोहितच्या या अर्धशतकानंतर मुंबई इंडियन्सनने केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.रोहितचे अर्धशतक झाल्यावर मुंबई इंडियन्सने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये मुंबई इंडियन्सने अशी एक माहिती लिहीली होती, जी जास्त कोणाला माहिती नव्हते. चाहत्यांनी रोहितच्या अर्धशतकानंतर जोरदार सेलिब्रेशन केले. पण मुंबई इंडियन्सने मात्र त्यांना अचूक माहिती दिली. मुंबई इंडियन्सने यावेळी रोहित शर्माचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. रोहितच्या जर्सीवर ४५ हा अंक असतो. मुंबई इंडियन्सने यावेळी ४५ + ५ असे लिहिले आहे. रोहितचे अर्धशतक तर झालेच, पण बऱ्याच जणांना माहिती नसेल की, रोहित शर्माचे हे ५० वे अर्धशतक होते. ही खास माहिती मुंबई इंडियन्सने यावेळी आपल्या चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांना मुंबई इंडियन्सने दिलेली ही माहिती पसंत पजली आहे. त्यामुळे यावेळी मुंबई इंडियन्सचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. रोहित शर्माचे हे आशिया चषक स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक ठरले आहे.रोहित शर्माने या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण रोहितसाठी हे अर्धशतक खास ठरले आहे. मुंबई इंडियन्सने यावेळी सूचक ट्विट करत आपल्या चाहत्यांना अचूक माहिती देण्याचे काम चोख बजावले आहे.