पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर ढेकू गाव कि.मी ३७/०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यात ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते २.३० या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
सचिनच्या मदतीमुळेच अफगाणिस्तानने रचला इतिहास, शतकवीराने सांगितली सिक्रेट गोष्ट…
काम पूर्ण झाल्यावर दुपारी २.३० वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी ३.०० वाजता मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी ग्रँटी टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे वारंवार विशेष ब्लॉक घेतला जात आहे. त्यात उद्या पुन्हा अर्ध्या तासाचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्यात केदारनाथमध्ये भेट? दोघांच्या भेटीत काय घडलं? जाणून घ्या
त्यामुळे मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी. हा महामार्ग पुणे आणि मुंबई तील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक प्रवाशी नागरिक या मार्गावर दररोज ये जा करत असतात. त्यातच दिवाळीची सुट्टी लागल्याने अनेक नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यातच उद्या अर्ध्या तासाच्या ब्लॉक घेतल्याने गावी जाणाऱ्या नागरिकांना काही वेळ महामार्गावर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी २.३० ते ३.०० यावेळेत प्रवासासाठी बाहेर पडू नये असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चार दिवसात कुणबी जातीच्या नोंदी तपासा, नागपूरचे जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर,जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे आदेश

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर रुग्णवाहिका जळून खाक, लाइफ सपोर्ट सिस्टम बंद पडल्याने रुग्ण मृत्यूमुखी

Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *