हायलाइट्स:
- आमदारांना टोलमाफ असल्यामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून टॅक्सी नेण्यास सांगितले
- टॅक्सीचालकाने नकार देत टोलच्या पैशांवरून वाद घालण्यास सुरुवात केली
- टॅक्सीचालक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता
भंडाऱ्यातील तुमसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे (५३) हे बुधवारी सकाळी दिल्लीहून मुंबई विमानतळावर आले. तेथून आकाशवाणी आमदार निवासाकडे जाण्यासाठी त्यांनी टर्मिनस २ येथून ओला कंपनीची एक टॅक्सी आरक्षित केली. आमदार असल्याचे सांगून, आमदारांना टोलमाफ असल्यामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून टॅक्सी नेण्यास सांगितले. मात्र, टॅक्सीचालकाने नकार देत टोलच्या पैशांवरून वाद घालण्यास सुरुवात केली. टोल घेतला, तर टोलचे पैसे देईन, असेही आमदार कारेमोरे यांनी त्याला सांगितले. पण टॅक्सीचालक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने आमदार निवास येथे जाण्यास नकार दिला आणि कारेमोरे यांना वाकोला जंक्शन येथे टॅक्सीतून खाली उतरवले. तसेच हात-पाय तोडून ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकारानंतर आमदार कारेमोरे जवळच्या वाकोला पोलिस ठाण्यात गेले आणि त्यांनी चालकाविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.