मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी आठपदरीकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्य सरकारकडे सादर केला आहे. शिंदे सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवल्यास वर्षभरात या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी ९४.५ किमी लांबीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधण्यात आला. २००२ साली हा मार्ग पूर्णत: वाहतुकीला खुला झाला होता. मुंबईहून पुणे गाठण्यासाठी लागणारा चार ते पाच तासांचा अवधी यामुळे अवघ्या अडीच तासांवर आला.

Good News:गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय; मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत महत्त्वाचा निर्णय
राज्यातील सर्वात बिझी मानल्या जाणाऱ्या या मार्गावरुन रोज जवळपास एक लाख ५५ हजार वाहने धावतात. मात्र कालौघात हा एक्स्प्रेस वेही अपुरा पडू लागला आहे. भविष्यात वाहनसंख्या आणखी वाढण्याचा अंदाज लक्षात घेतसहापदरी मार्गाचे आता आठपदरीकरण करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

मराठी सिनेमातून सुरुवात, करोना काळात फटका; पुण्याच्या दाम्पत्याला आता मशरुम शेतीतून सुपर नफा
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिक जामचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. याशिवाय वाढत्या अपघातांची डोकेदुखीही आहेच. या सर्व बाबी लक्षात घेता एमएसआरडीसीने मार्गाच्या आठपदरीकरणाचा प्रस्ताव पाठवला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पूल धुक्यात हरवला, वाहनचालकांचा भरदिवसा हेडलाईट लावून प्रवास

एक्स्प्रेस वेच्या आठपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी दूर होण्याची शक्यता आहे. पण यासाठी किमान तीन ते चार वर्ष वाट पाहावी लागणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *