मुंबईत भीषण अपघात:अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर जखमींना तातडीने केले रुग्णालयात दाखल

मुंबईत भीषण अपघात:अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर जखमींना तातडीने केले रुग्णालयात दाखल

मुंबईच्या आरसीएफ पोलिस स्टेशनच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 1.50 च्या सुमारास गवहापाडा-शंकर देव रस्त्यावर क्वालिस गाडीच्या चालकाचा नियंत्रण सुटून गाडी पलटी होत थेट एका टँकरवर धडकली. या गाडीत एकूण सहा प्रवासी होते व सर्व एकाच परिसरातील रहिवासी आहेत. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे भीषण जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला दिली धडक समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ आयशर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये हा अपघात झाला आहे.समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने पाठिमागून जोरदाची धडक दिली, हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. दरम्यान या टेम्पो ट्रॅव्हलरमधून एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते, या अपघातामध्ये हे 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जखमींपैक चालक आणि वाहकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्सने ट्रकला दिलेली धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. जखमींपैकी ड्रायव्हर आणि सहायकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

​मुंबईच्या आरसीएफ पोलिस स्टेशनच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 1.50 च्या सुमारास गवहापाडा-शंकर देव रस्त्यावर क्वालिस गाडीच्या चालकाचा नियंत्रण सुटून गाडी पलटी होत थेट एका टँकरवर धडकली. या गाडीत एकूण सहा प्रवासी होते व सर्व एकाच परिसरातील रहिवासी आहेत. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे भीषण जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला दिली धडक समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ आयशर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये हा अपघात झाला आहे.समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने पाठिमागून जोरदाची धडक दिली, हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. दरम्यान या टेम्पो ट्रॅव्हलरमधून एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते, या अपघातामध्ये हे 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जखमींपैक चालक आणि वाहकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्सने ट्रकला दिलेली धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. जखमींपैकी ड्रायव्हर आणि सहायकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment