शासनाकडून उपोषण बेदखल; सोमवारपासून नगर शहराचा पाणीपुरवठा:वैद्यकीय सेवा बंद, मनपा कामगार युनियन आक्रमक
मनपा कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत राज्य शासनाने पाचव्या दिवशीही दखल न घेतल्याने युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरूच आहे. तिघांची प्रकृती खालावली असून, दोघांना सलाईन लावण्यात आले आहे. दरम्यान, सफाई कामगार स्वतःहून आंदोलनात सहभागी झाल्याने शहरातील साफसफाई कोलमडली आहे. शहरात सर्वत्र स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यातच सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा, दवाखाने, स्ट्रीट लाईट बंद ठेवणार असल्याची माहिती युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी दिली. गेल्या पाच दिवसांपासून युनियन पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर या तिघांचीही प्रकृती खालावली आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी विनंती केल्यावर सायंकाळी सारसर व राशीनकर या दोघांना सलाईन लावण्यात आले. मात्र, मुदगल यांनी सलाईन घेण्यास नकार दिला. रात्रीपर्यंत त्यांची मनधरणी सुरू होती. दरम्यान, सातवा वेतन आयोग मंजूर करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित आहे. राज्य शासनाला आंदोलनाची माहिती देऊनही अद्याप त्याची दखल घेतली न गेल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. साफसफाई न झाल्याने रस्त्यावर साचला कचरा सफाई कामगारांनी इशारा दिल्याप्रमाणे शुक्रवारी साफसफाईचे काम बंद ठेवले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर, घरासमोर, बाजारपेठेत दुकानासमोर कचरा तसाच पडून होता. महापालिकेकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा बंद होऊ देणार नाही ^ शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच निर्णय होईल. युनियनने इशारा दिला असला, तरी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा बंद होऊ देणार नाही. – यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका