इतरसेवानिवृत्ती हा स्वल्पविराम:गोवेकरांनी सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे- मुरलीधर मोहोळ

इतरसेवानिवृत्ती हा स्वल्पविराम:गोवेकरांनी सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे- मुरलीधर मोहोळ

पोलिस दलातील या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत चांगले अधिकारी, जीवाभावाचे सहकारी भेटले. कर्तव्यावर असलेल्या सर्वच ठिकाणी नागरिकांचे सहकार्य, प्रेम लाभले. पुण्यात सर्वाधिक काळ सेवा बजावता आली. पुण्याने मला जितके प्रेम दिले, तितके कोणीच दिले नाही. पुणेकरांच्या प्रेमाने, आजच्या नागरी सत्काराने भारावून गेलो. सर्व पक्षांनी एकत्रित येऊन केलेला हा सत्कार संस्मरणीय क्षण आहे. या प्रवासात पत्नी शर्मिला, माझ्या कुटुंबीयांचे योगदान प्रेरक ठरले. मुलांच्या पालनपोषणात मला फारसे लक्ष घालावे लागले नाही. त्यांच्या खंबीर साथीमुळे प्रदीर्घ काळ मोकळेपणाने चांगली सेवा देता आली, अशी भावना निवृत्त सहायक पोलीस अधिकारी सतीश गोवेकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती पदकाने सन्मानित सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) सतीश गोवेकर सेवानिवृत्त झाले. गोवेकर यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने पुणेकरांच्या वतीने केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हस्ते त्यांचा भव्य नागरी सपत्निक सत्कार करण्यात आला. डीपी रस्त्यावरील घरकुल लॉन्समध्ये झालेल्या या समारंभास शर्मिला गोवेकर, राज्याचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे, शिवसेनेचे शहर प्रमुख अजय भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ऍड. मंदार जोशी, परशुराम वाडेकर, प्रसन्न जगताप, सतीश गोवेकर सेवापूर्ती गौरव समितीचे समन्वयक बाळासाहेब दाभेकर, अंकुश काकडे, दत्ता सागरे, प्रमोद घाडगे, अजित दरेकर, बाळासाहेब बोडके, ऍड. मंदार जोशी, संदीप खर्डेकर, बापूसाहेब भेगडे, निरंजन दाभेकर, राजेश येनपुरे, संजय उभे, धनंजय वाडकर, तुषार पाटील, अशोक येनपुरे आदी उपस्थित होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले, शहराची सामाजिक व राजकीय सर्वपक्षीय पिढी गोवेकर यांच्या सत्काराला एकत्रित आली हा सुखावह योगायोग आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपली कायम ओळख राहिली. राज्यातील विविध शहरात सेवा देताना आपण आपल्या कार्याचा ठसा उमटवला. राजकारणी आणि पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. पण आपण त्याला अपवाद आहात. या कार्याचा गौरव म्हणून आपल्याला दोनवेळा राष्ट्रपती पदक मिळाले. पुणेकर फार कोणाचे कौतुक करत नाहीत. पण सगळे मिळून आपला सत्कार करतात, याचा अर्थ चांगल्या गोष्टीला दिलेली दाद आहे. शहराची कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी आपण दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. सेवानिवृत्ती हा स्वल्पविराम असून, आता सामाजिक कार्यात सक्रियपणे काम करण्यास सुरुवात करावी. आपल्या हातून सामाजिक सेवेचे हे कार्य अविरतपणे होत राहो.

​पोलिस दलातील या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत चांगले अधिकारी, जीवाभावाचे सहकारी भेटले. कर्तव्यावर असलेल्या सर्वच ठिकाणी नागरिकांचे सहकार्य, प्रेम लाभले. पुण्यात सर्वाधिक काळ सेवा बजावता आली. पुण्याने मला जितके प्रेम दिले, तितके कोणीच दिले नाही. पुणेकरांच्या प्रेमाने, आजच्या नागरी सत्काराने भारावून गेलो. सर्व पक्षांनी एकत्रित येऊन केलेला हा सत्कार संस्मरणीय क्षण आहे. या प्रवासात पत्नी शर्मिला, माझ्या कुटुंबीयांचे योगदान प्रेरक ठरले. मुलांच्या पालनपोषणात मला फारसे लक्ष घालावे लागले नाही. त्यांच्या खंबीर साथीमुळे प्रदीर्घ काळ मोकळेपणाने चांगली सेवा देता आली, अशी भावना निवृत्त सहायक पोलीस अधिकारी सतीश गोवेकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती पदकाने सन्मानित सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) सतीश गोवेकर सेवानिवृत्त झाले. गोवेकर यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने पुणेकरांच्या वतीने केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हस्ते त्यांचा भव्य नागरी सपत्निक सत्कार करण्यात आला. डीपी रस्त्यावरील घरकुल लॉन्समध्ये झालेल्या या समारंभास शर्मिला गोवेकर, राज्याचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे, शिवसेनेचे शहर प्रमुख अजय भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ऍड. मंदार जोशी, परशुराम वाडेकर, प्रसन्न जगताप, सतीश गोवेकर सेवापूर्ती गौरव समितीचे समन्वयक बाळासाहेब दाभेकर, अंकुश काकडे, दत्ता सागरे, प्रमोद घाडगे, अजित दरेकर, बाळासाहेब बोडके, ऍड. मंदार जोशी, संदीप खर्डेकर, बापूसाहेब भेगडे, निरंजन दाभेकर, राजेश येनपुरे, संजय उभे, धनंजय वाडकर, तुषार पाटील, अशोक येनपुरे आदी उपस्थित होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले, शहराची सामाजिक व राजकीय सर्वपक्षीय पिढी गोवेकर यांच्या सत्काराला एकत्रित आली हा सुखावह योगायोग आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपली कायम ओळख राहिली. राज्यातील विविध शहरात सेवा देताना आपण आपल्या कार्याचा ठसा उमटवला. राजकारणी आणि पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. पण आपण त्याला अपवाद आहात. या कार्याचा गौरव म्हणून आपल्याला दोनवेळा राष्ट्रपती पदक मिळाले. पुणेकर फार कोणाचे कौतुक करत नाहीत. पण सगळे मिळून आपला सत्कार करतात, याचा अर्थ चांगल्या गोष्टीला दिलेली दाद आहे. शहराची कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी आपण दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. सेवानिवृत्ती हा स्वल्पविराम असून, आता सामाजिक कार्यात सक्रियपणे काम करण्यास सुरुवात करावी. आपल्या हातून सामाजिक सेवेचे हे कार्य अविरतपणे होत राहो.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment