माझा मुलगा मुख्यमंत्री होणार:देवेंद्र फडणवीसांना आई सरिता यांच्या खास शुभेच्छा; म्हणाल्या, ‘त्याने मुख्यमंत्री व्हावे, ही जनतेची इच्छा’

माझा मुलगा मुख्यमंत्री होणार:देवेंद्र फडणवीसांना आई सरिता यांच्या खास शुभेच्छा; म्हणाल्या, ‘त्याने मुख्यमंत्री व्हावे, ही जनतेची इच्छा’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील भाजप आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांना त्यांची आई सरिता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावे, ही राज्यातील जनतेची इच्छा असल्याचेही सरिता फडणवीस यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वात मोठे नेते मानले जातात. त्यांच्या नेतृत्वातच भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढली आणि मोठा विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून देखील देवेंद्र फडणवीस यांनी मोठा विजय मिळवला आहे. या निकालामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा सीएम पदावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात आता त्यांच्या आई सरिता फडणवीस यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत भाजपाचा स्ट्राइक रेट हा 84 टक्के पाहायला मिळाला. फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला तिसऱ्यांदा सर्वाधिक बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व अबाधित राहिले आहे. उद्धव ठाकरे सोबत नसताना देखील दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे वादळ:राज्यातील सर्वात मोठा पक्ष; फडणवीसच मुख्यमंत्री होण्याचा दावा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे वादळ दिसून आले. 2014 मध्ये मोदी लाटेत देखील एवढा मोठा विजय भाजपला मिळाला नव्हता. तेवढा विजय या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवला आहे. भाजप राज्यातील एकमेव सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इतर कोणत्याही पक्षाला तीन आकडी आकडा गाढता आलेला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा केला आहे. पूर्ण बातमी वाचा… विधानसभेचा निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही:संजय राऊत पुन्हा बरसले; निकालावर विश्वास बसूच शकत नसल्याचा दावा मोदी – शहा – फडणवीस यांनी काय दिवे लावले की ते 120 च्या पुढे गेले? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सध्याचा जो कौल आहे, याला कौल कसा म्हणावे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा जनतेचा कौल नव्हता, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही ग्राउंडवर होतो, त्यामुळे आम्हाला जनतेचा कॉल माहिती होता. हे निकाल अदानी यांनी लावून घेतले आहेत. या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही माणणाऱ्या माणसाचा विश्वास बसूच शकत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा….

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment