मायलेकीचा बुडून मृत्यू, आत्महत्या की घातपात कारण अस्पष्ट:गल्लेबोरगावच्या दुधारेवस्तीवरील घटना
गल्लेबोरगाव येथील आखतवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर राहणाऱ्या एका माय-लेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आई वंदना भरत दुधारे (३६) वर्षे तर मुलगी पल्लवी भरत दुधारे (१८)असे आत्महत्या केलेल्या आई व मुलीचे नाव आहे. आई व मुलीने आत्महत्या का केली याचा तपास खुलताबाद पोलिस करत आहेत. आईचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला तर मुलीचा मृतदेह तळाला असल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलिस पाटील सिंधुताई बढे यांनी दिली. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की,भरत दुधारे आपल्या पत्नी, मुलाबाळासह व आई-वडिलांना सोबत गल्लेबोरगाव ते आखतवाडा रोड वरील गट नं. ४०३ शेत वस्तीवर राहतात. बुधवारी रात्री सर्व नेहमीप्रमाणे कामे आटोपून भरत दुधारे त्यांचे कुटुंबीय झोपले होते. गुरुवारी पहाटे कुटुंब प्रमुख भरत उठले असता त्यांना त्यांची पत्नी वंदना दुधारे व मुलगी पल्लवी या दोन्ही माय-लेकी घरात दिसून आल्या नाही. यामुळे भरत दुधारे यांनी काही वेळ पत्नी व मुलीची घरात येण्याची वाट बघितली.नंतर शोध घेण्यास सुरुवात केली. शेतातील विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीच्या कडेला पत्नी व मुलीची चप्पल दिसून आल्या. भरत दुधारे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीतील पाण्यात त्यांच्या पत्नीचा मृतदेह तरंगत असताना त्यांच्या निदर्शनास आले. मात्र मुलगी दिसली नाही. भरत दुधारे बुचकळ्यात पडले. नेमकी मुलगी पल्लवी चप्पल विहिरीच्या कडेला ठेवून गेली कुठे म्हणून भरत दुधारे यांनी पोलिस पाटील सिंधुताई बढे यांना फोनवर घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील बढे यांनी तत्काळ खुलताबाद पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी तत्काळ ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. पल्लवी प्रथम वर्षात तर आई घरकाम करायची पल्लवी ही गल्लेबोरगाव येथील नाथ माध्यमिक विद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर पल्लवीची आई घरची शेतीची कामे करत होती. अचानक आई व मुलीने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन का संपवले याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस या विषयी चौकशी करत आहेत. याप्रकरण खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.