चंद्रपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा सांगत महाराष्ट्राला डिवचलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांचा मुद्दा बोम्मई यांनी उकरून काढला. त्यापाठोपाठ बोम्मईंनी अक्कलकोट आणि सोलापूरवर दावा सांगितला. याला महाराष्ट्र सरकारकडून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल अशी भूमिका मांडण्यात आली. जत तालुक्यातील ४० गावांनी पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ असा इशारा दिला आहे. तर, पंढरपूरमधील नवा विकास आराखडा थांबवा अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ असा इशारा देण्यात आला आहे. आता यामध्ये आणखी १४ गावांचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, प्रश्न महाराष्ट्र कर्नाटकशी संबंधित नसून महाराष्ट्र तेलंगणाशी आहे. जमिनीचे पट्टे देईल ते आमचे राज्य अशी भूमिका १४ गावांनी घेतली आहे.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर कर्नाटक सरकारने आपला दावा सांगण्याचे प्रकरण ताजे आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या १४ गावांचा सीमा प्रश्न चर्चेत आला आहे.९० च्या दशकात तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने जिवती तालुक्यातील १४ गावांवर आपला हक्क सांगितल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र, १९९७ साली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निर्वाळा महाराष्ट्राच्या बाजूने दिल्यानंतरही आजपर्यंत ही गावे पूर्णतः महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होऊ शकलेली नाही. हे वास्तव आहे. या गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये व कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत.

ऑफर! ट्रेनचं तिकीट कन्फर्म न झाल्यास मिळणार थेट फ्लाइटचं तिकीट

देशामध्ये एकाच ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करतात असेही उदाहरण इथेच सापडते. मात्र आता कर्नाटकशी असलेला सीमावाद सोडविण्यासाठी एका समन्वय समितीची स्थापना झाली आहे. त्याच धर्तीवर हा प्रश्न देखील सोडवला जावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

FIFA World Cup : ९० मिनिटांचा वेळ संपल्यावरच इराणने मिळवला थरारक विजय

तेलंगणा सरकारने निवडणूक घेतल्यावर सरपंच झालेल्या लोकप्रतिनिधींनी जे राज्य कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देतील व सोबतच शेतीला वीज पुरवठा करून देतील त्यांच्याकडे आपण जाणार असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्रवादी सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने हा तिढा सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखविली आहे.

एकनाथ शिदेंचं मिशन राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हाध्यक्ष फोडत कोल्हापुरात लवकरच धक्का देणार?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *