शेअर मार्केटच्या नादात 1.5 महिन्यात गमविले 1 कोटी 94 लाख:नवीन घरासाठी जमवले होते पैसे
शेअर मार्केट मधुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने आयटी कंपनीत हिशेब विभागात काम करणार्या एकाची तब्बल १ कोटी ९४ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. अवघ्या दिड महिन्यात हि फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा रस्ता बिबवेवाडी भागात राहणार्या ४२ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध फसवणूकीसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना ३० मे ते १७ जुलै २०२४ या दरम्यानच्या काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांचे कॉमर्स मधून पदविचे शिक्षण झाले असून ते हिंजवडी भागातील एका आयटी कंपनीत हिशेब विभागात काम करतात. सायबर चोरट्यांनी तक्रारदार यांच्याशी व्हाटसऍपच्या माध्यमातुन संपर्क करुन शेअर मार्केट मधुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यानंतर तक्रारदार यांना एक लिंक पाठवून एआरएईएस मॅनेजमेेट सर्व्हिस नावाचे ऍप डाउनलोड करायला लावले. सायबर चोरट्यांनी तक्रारदार यांना एआरएईएस मॅनेजमेेट सर्व्हिस ऍपच्या माध्यमातुन वेगवेगळ्या कंपन्यांचे आयपीओ विकत घ्यायला लावले. काही वेळेनंतर ऍप मध्ये आयपीओ लॉस मध्ये दिसत होते. त्यावेळी सायबर चोरटे तक्रारदार यांना तुमचा लॉस भरून काढतो असे सांगून तुम्ही ४० टक्के भरा आम्ही ६० टक्के भरु असे सांगून वेगवेगळ्या १२ बँक खात्यात १ कोटी ९४ लाख रुपये पाठवायला लावले. तसेच तक्रारदार यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यावर १हजार १०० रुपये पाठविले. जेव्हा तक्रारदार ऍप मधुन पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते ते त्यांना काढता येत नव्हते. सायबर चोरटे वेगवेगळी कारणे सांगून त्यांना परत पैसे पाठवायला सांगत होते. यानंतर तक्रारदार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.