नाभिक समाजाने शैक्षणिक प्रगती साधावी:वरणगाव येथील कार्यक्रमात गोपाळ बाणाईत यांचे आवाहन, संत सेना महाराज पुण्यतिथी
श्री संत सेना महाराजांची शिकवण आचरणात आणावी. नाभिक समाजाने एकसंघ राहून शैक्षणिक व सामाजिक प्रगतीची कास धरावी, असे आवाहन गोपाळ बाणाईत यांनी केले. वरणगाव येथील नाभिक समाजाने नागेश्वर मंदिरात संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बढे, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी पंकज सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, राजेंद्र चौधरी, गणेश धनगर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठितांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात संत शिरोमणी सेना महाराजांची प्रतिमा पूजन व आरतीने झाली. नंतर नेपाळ येथील दुर्घटनेत जीव गमावलेल्या वरणगावमधील भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर संत सेना यांच्या विचारांचा सर्वांनी जागर केला. महाप्रसादाचे आयोजन : याप्रसंगी बाळू शिवरामे यांचेकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते. कमलेश येवले, संतोष रेलकर, सुधाकर आमोदकर, तुकाराम सनांसे, गोटू सनांसे, दत्ता निमकर व सर्व नाभिक समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.