नागपूर: तेल अवीव जवळच्या गावात जन्मलेली आणि नागपुरात लहानाची मोठी झालेली सिवान जेकब जैस्वाल युद्धग्रस्त इस्रायलमध्ये तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलासह अडकून पडली आहे. तिच्याकडे इस्त्रायलचं पासपोर्ट असल्याने भारतीय अधिकाऱ्यांनी तिला मदत करण्यास नकार दिला होता. ४७० हून अधिक भारतीयांना घरी आणणार्‍या एअर इंडियाच्या आपत्कालीन फ्लाइटमध्ये ती चढू शकली नव्हती. तेव्हा सिवानने भारतीय अधिकार्‍यांना आवाहन केलं होतं की तिला नागपुरात असलेल्या तिच्या पतीकडे परतण्यास मदत करावी.

पॅलेस्टिनी कट्टरपंथी गट हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यानंतर ती इस्रायलच्या राजधानीजवळील बेनी ब्रेकमध्ये तिच्या मुलासोबत दहशतीत प्रत्येक दिवस घालवत आहे. तिचे पती अंकुशही प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या पाहून अस्वस्थ झाला आहेत. जानेवारीमध्ये सिवान आपल्या मुलासाठी इस्रायली पासपोर्ट आणि व्हिसाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी इस्रायलला गेली होती आणि तिची डिसेंबरमध्ये परतण्याची योजना होती.

क्षुल्लक वाद अन् प्रेम कहाणीचा हृदयद्रावक अंत, ४ महिन्यांपूर्वी विवाह, आता एकत्र अंत्ययात्रा
अंकुशने २००८ मध्ये सिवानसोबत प्रेमविवाह केला होता. मार्च २०२० मध्ये कोविड लॉकडाऊन दरम्यान प्रदीर्घ प्रतीक्षा आणि वैद्यकीय गुंतागुंतीनंतर या जोडप्याला मुलगा झाला. नंतर, मुलाला आपल्या कुटुंबाशी आणि नातेवाइकांशी ओळख करुन देण्यासाठी सिवान इस्रायलला आली होती झाली.

“माझ्या मुलाने नागपुरात अडीच वर्षे घालवली. त्याच्यासाठी, बॉम्ब, रॉकेट, बंकर, सायरन, हिंसा आणि युद्ध हे फक्त व्हिडिओ गेमचा भाग होते. एव्हीएलला सायरन, स्फोट, क्षेपणास्त्रे पडणे किंवा बंकरमध्ये बसण्याची सवय नाही. इस्रायलमध्ये जन्मलेली मुले युद्धाशी परिचित आहेत. परंतु माझा मुलगा नाही. त्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून वाचवणे माझ्यासाठी खूप कठीण जात आहे”, असं सिवान म्हणाली. सिवान ही ज्यू आहे आणि ती नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधून वाणिज्य पदवीधर आहे.

तिने Bnei Brak वरून फोनवर टाइम्सला सांगितले की, जेव्हा एव्हीएल हा घाबरुन जातो तेव्हा ती त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की हा फक्त एक रिअल-टाइम व्हिडिओ गेम आहे. जिथे सायरन वाजल्यावर त्यांना बंकरमध्ये लपण्यासाठी गर्दी करावी लागते. पण, आता त्याला हळूहळू कळत आहे की हा व्हिडिओ गेम नाही, तर फार धोकादायक परिस्थिती आहे. सुरुवातीला, मी त्याची दिशाभूल करण्यात यश मिळवलं. परंतु आता ते शक्य होत नाहीये. पूर्वी सायरन वाजल्यानंतर मला त्याला उठवावे लागे. आता सायरन वाजताच तो भूमिगत बंकरकडे धावतो”.

छोटासा असणारा इस्रायल देश भल्याभल्यांवर का पडतोय भारी?

सिवान यांनी असेही सांगितले की, कुटुंब रात्री झोपू शकत नाही आणि प्रत्येक वेळी अलार्म वाजल्यावर लपण्यासाठी त्यांना धावावं लागतं. ऑपरेशन अजय सुरू झाल्यावर तिने भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण ती भारतीय पासपोर्ट धारक नसल्यामुळे तिला आपत्कालीन विमानांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली नाही, असंही सिवानने सांगितलं. भारतीय अधिकाऱ्यांनी सहानुभूतीच्या आधारावर तिच्या प्रकरणाचा पुनर्विचार करावा, मी संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांना ईमेल पाठवत आहे, त्यांना मला वाचवण्याची विनंती करत आहे, असंही सिवानने सांगितले.

सिवान यांचे पती अंकुश म्हणाले की, त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे आणि त्यांची पत्नी आणि मुलगा लवकरच भारतात परततील. जेव्हा एखाद्याची पत्नी आणि मुलगा युद्धग्रस्त देशात अडकलेले असतात तेव्हा कोण शांत राहू शकतं. आम्हाला १३ वर्षांनी मुलगा झाला. मी त्याला मोठं होताना पाहू शकत नाहीये, असंही ते म्हणाले.

आईचा डोळा लागला, झोप उघताच समोर काळीज तुटणारं दृश्य, १० महिन्यांचं बाळ पाण्याच्या बादलीत…
Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *