जयपूर: राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. सरधना परिसरातील जंगलात बकऱ्या चरण्यास घेऊन गेलेल्या एका वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका तरुणानं महिलेची दगडानं ठेचून हत्या तेली. त्यानंतर त्यानं महिलेच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं. त्यामुळे त्याचा चेहरा रक्तानं माखला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.सराधना गावात राहणाऱ्या वृद्ध शांती देवी नेहमीप्रमाणे जंगलात बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी जंगलात एका तरुणानं त्यांच्यावर हल्ला केला. मोठे दगड त्यांच्या डोक्यात घातले. या हल्ल्यात शांती देवी यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी तरुणानं महिलेचा चेहरा बोचकारला. तिच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं. त्यानंतर तरुणानं शर्ट काढून वृद्धेचा चेहरा झाकला.
पार्टी करताना अधिकाऱ्याचा मोबाईल पाण्यात पडला; पंप लावून जलाशय उपसला; लाखो लीटर पाणी वाया
बकऱ्यांना जंगलात चरण्यासाठी घेऊन गेलेल्या काहींनी हा प्रकार पाहिला. त्यांनी ग्रामस्थांना याबद्दलची माहिती दिली. आरोपीला पकडण्यासाठी ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यांना पाहून तरुण पळू लागला. जवळपास एक किलोमीटर त्याचा पाठलाग सुरू होता. अखेर ग्रामस्थांनी आरोपीला पकडलं आणि सेंदडा पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला अटक केली. तरुणानं त्याच्या दातांनी महिलेच्या चेहऱ्याचं मांस खाल्ल्याचं पोलिसांनी सांगितलं.
भयंकर! शेतात बायकोवर वार; शिर हातात घेऊन गावात आला; दारात ठेवून कित्येक तास बसून राहिला
सुरेंद्र असं आरोपीचं नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे. तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. छिन्नविछिन्न अवस्थेत असलेला महिलेचा मृतदेह पोलिसांनी सेंदडा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. तरुणानं वृद्धेची अशा पद्धतीनं निर्घृण हत्या का केली? मुंबईतला तरुण जंगलात कशासाठी गेला होता?, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *