[ad_1]

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लेखक नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे काळं फासलं. नामदेवराव जाधव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा खोटा दाखला समोर आणला होता. तसेच त्यांनी शरद पवारांवर आरोप केले होते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुरावे देण्याची मागणी केली होती. तसेच, पुण्यातील त्यांचे कार्यक्रम उधळून लाववण्याचा इशारा दिला होता. पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन परिसरात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं. या प्रकरणानंतर जाधव यांनी फेसबुक लाइव्ह करत पुन्हा एकदा शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

नामदेवराव जाधव यांचा पुन्हा शरद पवार आणि रोहित पवारांवर निशाणा

नामदेवराव जाधव यांनी फेसबुक लाइव्ह करत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. पुण्यामध्ये आज आम्ही शिवजयंती अॅट सिंगापूर या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आलो होतो. या संदर्भातील कार्यक्रम या लोकांनी उधळून लावला, त्याच्यानंतर पत्रकारांशी बोलताना हा हल्ला करण्यात आला. शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांनी हा हल्ला केला. शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नयेत म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले. हा एक प्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले.
आढळराव पाटील अजित पवारांसोबत जाणार? शिरूरच्या राजकारणात जोरदार चर्चा, आढळराव म्हणाले….
हा हल्ला लोकशाहीवरचा आहे, संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो. कायदा व सुव्यवस्थेला चॅलेंज करण्याचा प्रयत्न आहे. हा पाच कोटी मराठ्यांवरचा हल्ला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले.

मी पोलीस आयुक्त कार्यालयात जाणार आहे. कायदेशीर कारवाई करणार असून कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नसून पहिलं नाव शरद पवार आणि दुसरं नाव रोहित पवार यांचं असेल. या दोघांची खासदारकी आणि आमदारकी घालवण्यासाठी प्रचंड मोठं पाऊल उचलणार असल्याचं नामदेवराव जाधव म्हणाले.
चांद्रयान ४ असेल ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम, चंद्राच्या या भागाचा घेणार वेध; वाचा सविस्तर..
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नामदेवराव जाधव यांच्यावरील शाईफेकीची जबाबदारी स्वीकारत असल्याचं म्हटलं. पुरावे न देता जाधव आरोप करत होते, असं जगताप म्हणाले.
Pune Crime: ललित पाटील प्रकरणाला धक्कादायक वळण, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
Read Latest Maharashtra News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *