Narayan Rane Juhu Adhish Bungalow: केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई हायकार्टकडून मोठा झटका बसला आहे. हायकोर्टने जुहूतील राणेंच्या अनधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवण्याचे आदेश बीएमसीला दिले आहेत. त्याशिवाय राणेंना १० लाख रुपयांचा दंडही लावला आहे. बीएमसीने राणेंना बंगल्याच्या अनधिकृत बांधकामासाठी नोटिस पाठवली होती. बंगल्याचं बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी १० लाख रुपये खर्च येणार आहे, जो राणेंना भरावा लागणार आहे. नियमानुसार, बंगल्याची उंची ११ मीटरहून अधिक असू नये, पण त्यांच्या बंगल्याची उंची ३२ मीटर उंच बनवण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टने २ आठवड्यांच्या आत हे बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत. नारायण राणेंना बीएमसीच्या के-वेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी नोटिस पाठवली आहे. मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ३५१ अंतर्गत बीएमसीने बनवलेल्या योजनेचं उल्लंघन केल्याबद्दल ही नोटिस जारी करण्यात आली आहे.

राणेंना १० लाखांचा दंड

महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी बंगल्याची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलं. त्यानुसार भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अधीश बंगल्यावर कारवाई करण्यात आली. बंगल्याचं बेकायदेशीर बांधकाम नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्या कंपनीचं आहे. न्यामूर्ती आरडी धानुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना कंपनीला १० लाखांचा दंड ठोठावला आहे. हा दंड महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बंगल्यात अनधिकृत बांधकाम

जुहूमध्ये राणेंचा ८ मजली अधीश बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलं होतं. राणेंच्या कंपनीनेच या बंगल्याचं बांधकाम केलं आहे. राणेंचा ११८७ चौरसमीटरहून अधिक जमिनीवर त्यांचा मालकी हक्क असल्याचं मालमत्ता कार्डवरुन स्पष्ट होतं. पालिकेकडून वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण भूखंड २,२०९ स्क्वेअर फूट आहे. त्यापैकी ११७८ स्क्वेअर फूट जागा त्यांना भाडेपट्ट्यावर देण्यात आली आहे. राणेंच्या कंपनीसाठी ७४५ स्क्वेअर फूटांसाठी बांधकाम आराखडा मंजूर करण्यात आला होता. मात्र कंपनीने तीन पट अधिक २,२४४ स्क्वेअर फूटात बांधकाम केलं.

बंगल्यात बांधकामावेळी एफएसआयचं उल्लंघन

महापालिकेच्या ९ अधिकाऱ्यांच्या पथकाने २१ फेब्रुवारीला नारायण राणेंच्या जुहूतील अधीश बंगल्याची पाहणी केली (Narayan Rane Juhu Adhish Bungalow Illegal Construction) होती. दोन तास पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी अधीश बंगल्यात बांधकामावेळी एफएसआयचं उल्लंघन झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. राणेंच्या अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली होती. त्यानंतर महापालिकेने पाहाणी करुन हे पाऊल उचललं.

अनधिकृत बांधकामाची पालिका अधिकाऱ्यांकडून पाहाणी

महापालिका आयुक्तांकडे राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांकडून पाहाणी करण्यात आली. या पाहाणीचा अहवाल अधिकाऱ्यांच्या पथकाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे सोपावला. राणेंना याबाबत कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आली होती, पण नोटिशीला उत्तर आलं नव्हतं. त्यानंतर अनधिकृत बांधकाम न काढल्यास कारवाई करण्यात येईल, असं नोटिशीत म्हटलं होतं. आता राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा मारण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

मालवणमधील बंगल्यावर कारवाई?

नारायण राणेंच्या जुहूतील बंगल्यावर करण्यात आलेली अशाप्रकारची कारवाई ही पहिलीच कारवाई नाही. याआधीही त्यांच्या एका बंगल्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मालवण जिल्ह्यातील चिवला इथे राणेंचा निलरत्न हा बंगला आहे. हा निलरत्न बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झाल्याची तक्रारी माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून करण्यात आली होती. २०२१ ही तक्रार करण्यात आल्यानंतर या बंगल्यावर कारवाईचे आदेश राज्य सरकार नाही, तर केंद्र सरकारकडून आले होते. आता या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.