नारायण राणेंविरोधात प्रकाश महाजन यांनी थोपटले दंड:चुकीच्या बिळात हात घातला म्हणत संभाजीनगरात आंदोलन; घराचा पत्ताही दिला नारायण राणेंविरोधात प्रकाश महाजन यांनी थोपटले दंड:चुकीच्या बिळात हात घातला म्हणत संभाजीनगरात आंदोलन; घराचा पत्ताही दिला

नारायण राणेंविरोधात प्रकाश महाजन यांनी थोपटले दंड:चुकीच्या बिळात हात घातला म्हणत संभाजीनगरात आंदोलन; घराचा पत्ताही दिला

नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आहे. मी राज ठाकरे यांचा खरा कार्यकर्ता आहे, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहेत. नारायण राणे – प्रकाश महाजन यांच्या वादा नंतर प्रकाश महाजन यांना धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली अर्धा तास आंदोलन केले. मी इथे उभा आहे किंवा कुठे यायचे मला सांगा, मी यायला तयार असल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. मी माझ्या घराचा पत्ता देखील सांगायला तयार आहे. मला मारहाण करून तुमच्या मनाचे समाधान होत असेल तर मारहाण करा, अशा शब्दात त्यांनी राणे यांना इशारा दिला आहे. नारायण राणे यांना मी मायबोली मराठी भाषेत टीका केली आहे. राज ठाकरे वरील टीकेला, त्याच शब्दांत उत्तर दिले जाईल, असे देखील प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात दंड थोपटत त्यांनी थेट इशाराच दिला आहे. नारायण राणे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या वडिलांच्या वयाचे आहेत. अशावेळी नारायण राणे यांनीच मुलाचे कान धरून मोठ्या व्यक्तीला कसे बोलायला हवे, हे शिकवायला हवे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. नारायण राणे यांनीच मुलांचे कान टोचायला हवे होते, अशा शब्दात महाजन यांनी नारायण राणे यांना सल्ला देखील दिला आहे. राणेंच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नुकतीच नीलेश राणे, नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? असा सवाल करत प्रकाश महाजन हे लायकी पेक्षा जास्त बोलत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम करेन, अशा शब्दांत खडे बोल सुनावले होते. त्यानंतर महाजन यांना राणेंच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. नेमके काय म्हणाले नारायण राणे? प्रकाश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. श्रीयुत राज आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? कुठल्या एखादया पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये एवढी तुमची कुवत नाही. श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुध्दी मत्ता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. श्रीयुत नीलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात? आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण नीलेश, नितेशना निष्ठा शिकवण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन, असा दम देखील नारायण राणेंनी प्रकाश महाजन यांना भरला आहे. काय म्हणाले होते प्रकाश महाजन? महाराष्ट्राच्या जनतेने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकाला 20 आमदार दिले तर दुसऱ्याला शून्य आमदार दिले. आम्ही एवढे घाबरलो की आम्हाला झोप लागत नाहीये, एवढी भाजपला भिती वाटत आहे की आता आमचे कसे होणार? अशा शब्दांत नीतेश राणे यांनी राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेची खिल्ली उडवली होती. त्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नीतेश राणेंना लक्ष्य केले होते. टीका करणाऱ्यांनी आपल्या औकातीत रहावे, असे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले होते. नितेश राणे यांची वैचारिक उंची ते उभे राहिले तर लवंग येवढी आहे अन् बसले तर विलायची येवढी होते. त्यामुळे आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. ते त्यांच्या वैचारिक उंची आणि रुंदी प्रमाणे सल्ले देत असतात. त्यामुळे नितेश राणे यांनी शक्तीच्या बाहेर धोंडा उचलू नये, असा सल्लाही प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांना दिला होता.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *